उंदिरवाडी येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला
- CT INDIA NEWS

- Sep 24, 2020
- 1 min read

*CT INDIA NEWS लासूर स्टेशन प्रतिनिधी मनिष मुथा
*उंदीरवाडी येथे मराठवाड़ा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला ......*
उंदीरवाडी जि प शाळेत विद्यार्थ्या विना
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.वैजापूर तालुक्यातील उंदिरवाडी या छोट्या शा गावातील उपक्रमशील शिक्षक अंगद गोविंदराव लोणे यांना शैक्षणिक कार्यात भरीव कार्य केल्या बद्दल माझी शाळा माझा उपक्रम अंतर्गत. शब्दगंध समूह प्रकाशन'तर्फे राष्ट्रीय पुरस्कारा साठीचे जाहिर निवड पत्र देण्यात आले आहे. याबद्दल ध्वजारोहणाला निमित्त जमलेले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब कदम ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कचरू त्रिभुवन, समिती सदस्य बजरंग बडक, शिक्षण प्रेमी पुंडलिक आप्पा कदम, पालक गोकुळ कदम यांच्या हस्ते आपल्याला शाळेतील उपक्रमशील शिक्षक अंगद लोणे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. शब्दगंध समूह प्रकाशन'तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील विशेष असे शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. महात्मा फुले आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार करिता अंगद लोणे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या मित्रपरिवारकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.







Comments