top of page

उपचारा साठी निघालेली जीप नदी पात्रात कोसळली

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Nov 28, 2019
  • 2 min read

ree

वार्ताहार-रामसर रेघाटे(जिंतूर)-महिलेला उपचारासाठी घेऊन जाणारी जीप नदी पात्रात कोसळली : चारजण जखमी : जिंतूर तालुक्यातील मंगळवारची दुर्घटना. ..जिंतूर (२६/११/१९, बातमीदार, राजाभाऊ नगरकर) महिला रुग्णास औरंगाबाद येथे घेऊन जात असलेली खाजगी जीप शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर जिंतूर-जालना राज्य महामार्गावरील पुलावरून नदीपात्रात कोसळली.यात चरजण गंभीर जखमी झाले. मंगळवारी (ता.२६) पहाटे साडेपाचच्या सुमारास हि घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील भागीरथाबाई जाधव (वय ६८ वर्षे) यांना वैद्यकीय उपचारासाठी त्यांचे कुटुंबीय औरंगाबाद येथे नेत असताना गाडी चालकाला पुलावरील रस्त्याच्या बाजुचा अंदाज न आल्याने जीप नदी पात्रात कोसळली यामध्ये वनिता शिवाजी गिरामकर (वय ४० वर्षे) दत्तराव लक्ष्‍मण जाधव (वय ७० वर्षे) कृष्णा शिवाजी गिरामकर (वय २५ वर्षे) सर्व राहणार हादगाव जिल्हा नांदेड.अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यारस्त्यावर खड्डेच खड्डे असून वळणाच्या तसेच पुलांवरील सार्वजनिक बांधकाम विभागाने रेडिएटर बसवले नाही त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज. आला नसल्याने हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे. दोन महिन्यापूर्वी याच पुलावरून जिंतूर- पुणे जाणारी ट्रॅव्हल्स पन्नास प्रवाशांसह पुलावरून नदीपात्रात कोसळली होती. ...... अपघातग्रस्त जीपचा फोटो आहे.....पूर्ण .......वार्ताहार-रामसर रेघाटे(जिंतूर)-महिलेला उपचारासाठी घेऊन जाणारी जीप नदी पात्रात कोसळली : चारजण जखमी : जिंतूर तालुक्यातील मंगळवारची दुर्घटना. ..जिंतूर (२६/११/१९, बातमीदार, राजाभाऊ नगरकर) महिला रुग्णास औरंगाबाद येथे घेऊन जात असलेली खाजगी जीप शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर जिंतूर-जालना राज्य महामार्गावरील पुलावरून नदीपात्रात कोसळली.यात चरजण गंभीर जखमी झाले. मंगळवारी (ता.२६) पहाटे साडेपाचच्या सुमारास हि घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील भागीरथाबाई जाधव (वय ६८ वर्षे) यांना वैद्यकीय उपचारासाठी त्यांचे कुटुंबीय औरंगाबाद येथे नेत असताना गाडी चालकाला पुलावरील रस्त्याच्या बाजुचा अंदाज न आल्याने जीप नदी पात्रात कोसळली यामध्ये वनिता शिवाजी गिरामकर (वय ४० वर्षे) दत्तराव लक्ष्‍मण जाधव (वय ७० वर्षे) कृष्णा शिवाजी गिरामकर (वय २५ वर्षे) सर्व राहणार हादगाव जिल्हा नांदेड.अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यारस्त्यावर खड्डेच खड्डे असून वळणाच्या तसेच पुलांवरील सार्वजनिक बांधकाम विभागाने रेडिएटर बसवले नाही त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज. आला नसल्याने हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे. दोन महिन्यापूर्वी याच पुलावरून जिंतूर- पुणे जाणारी ट्रॅव्हल्स पन्नास प्रवाशांसह पुलावरून नदीपात्रात कोसळली होती. ...... अपघातग्रस्त जीपचा फोटो आहे.....पूर्ण .......

Comments


bottom of page