top of page

*उमरी येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव साजरा* कारंजा( घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर. कारंजा( घा )

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 4, 2022
  • 1 min read

*उमरी येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव साजरा*


कारंजा( घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर.


कारंजा( घा ):- तालुक्यातील उमरी येथे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर ओम श्री सोहम साई शिव कैलास गिरी पर्यटन क्षेत्र उमरी आयोजित महाशिवरात्री यात्रा महोत्सव संपन्न करण्यात आला. त्यानिमित्ताने हरिभक्त परायण मनोज महाराज बैस काटोल यांचे ग्राम गीतेवर आधारित सुंदर असे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये गावातील तसेच बाहेर गावातील भक्त मंडळींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तसेच यामधे गावातील युवा मुलांचा मोलाचा वाटा होता. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भव्य महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलेले होते ,त्यामध्ये गावातील तसेच बाहेर गावातील मंडळींनी येवून आनंद द्विगुणित केला . हा कार्यक्रम शिवमुद्रा युवा ग्रुप उमरी व सर्व ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे पार पाडला .

Comments


bottom of page