'एक वही एक पेन 'अभियान 2019
- CT INDIA NEWS

- Dec 3, 2019
- 1 min read

वार्ताहार-शशिकांत कांबळे पुणे-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वीकारले जगाने अभिवादन करुया एक वही- एका पेनाने ! डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पारंपारिक पध्दतीने हार-तुरे-मेणबत्ती-अगरबत्ती न वाहता त्याऐवजी एक वही एक पेन देऊन वैचारिक अभिवादन करावे असे आवाहन फेस आॅफ आंबेडकराईट मूव्हमेंट (फॅम) तर्फे करण्यात येत आहे. आपण दिलेल्या वहीपेन, स्टेशनरी सरकारी शाळांतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहचवू आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका’ हा क्रांतिकारी संदेश प्रत्यक्षात उतरवू. सर्व व्यक्ती-संस्था-समूह यांनी मोठ्या संख्येने या क्रांतीकारी अभियानात सहभागी व्हावे ही नम्र विनंती. एक वही एक पेन अभियान ! दि. ६ डिसेंबर, २०१९ रोजी सकाळी ७:३० पासून विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंप्री चिंचवड़, पुणे संपर्क : शशिकांत कांबळे







Comments