एकदिवसीय जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन
- CT INDIA NEWS

- Sep 29, 2019
- 1 min read

वार्ताहार-मनीष मुथा लासुर दि. २५ सप्टेंबर २०१९ रोजी सलाम मुंबई फाउंडेशन व प्राथमिक शिक्षण विभाग औरंगाबाद ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री रोडगे सर( जिल्हा संशोधन सहाय्यक ) , श्री केवट सर ( गट शिक्षणाधिकारी खुलताबाद ) डॉ. अमोल काकडे (राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम) सलाम मुंबई फौंडेशनचे प्रशांत माने यांनी तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम, सत्यता, तंबाखूमुक्त शाळेचे ११ निकष आणि ती माहिती मोबाईल अँप वर कशाप्रकारे भरावी या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. डॉ काकडे यांनी सुद्धा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी प्रत्येक तालुक्यातून पाच शिक्षक त्या त्या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणजेच मास्टर ट्रेनर म्हणून आले होते जे पुढे तालुका पातळीवर अशा कार्यशाळेचे नियोजन करतील औरंगाबाद जिल्हा तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा व्हावा यासाठी रोडगे सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. तसेच तंबाखूमुक्त झालेल्या शाळांना प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सलाम मुंबई फाऊंडेशनचे प्रतिनिधी श्री. आत्माराम गायकवाड यांनी व्यसनमुक्ती वर गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली . या कार्यशाळेसाठी सलाम मुंबई फाऊंडेशनचे प्रतिनिधी श्री.आजीनाथ जोगदंडे, श्री.अमोल मालोदे, वाहुळ सर यांनी मोलाचे सहकार्य केले.







Comments