top of page

एसबीआयचे व्याजदर घटले; उद्यापासून लागू होणार नवे व्याजदर

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 9, 2019
  • 1 min read

ree

दिल्ली (वृत्तसंस्था)स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्जधारकांसाठी खुशखबर आहे. बँकेकडून सर्व कालावधीच्या कर्जावरील ‘एमसीएलआर’ अर्थात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट कमी केले आहेत यामुळे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.एमसीएलआरमध्ये १० बेसिस पॉइंटची बँकेने कपात केली असून व्याजदर १० बीपीएसने कमी होणार असल्याने गृहकर्ज स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.दरम्यान, नवे दर १० सप्टेंबरपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरातील कपातीमुळे वार्षिक एमसीएलआर ८.२५ टक्क्यांहून ८.१५ टक्क्यांवर आला आहे.एसबीआयने एकीकडे एमसीएलआरमध्ये कपात केली असतानाच, मुदत ठेवींवरील व्याजदरही कमी केले आहेत. प्रत्येक कालावधीसाठी रिटेल एफडीवर २०-२५ बेसिस पॉइंट्ची कपात केल्याची घोषणा आज करण्यात आली आहे.

Comments


bottom of page