**ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत करा,अन्यथा निवडणुका नको.*.
- CT India News
- Jun 19, 2021
- 2 min read
**ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत करा,अन्यथा निवडणुका नको.*.ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील,आरक्षण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली गेली नसल्याने रद्द झाले आहे,ओबीसी समाजाच्या सामाजिक, आर्थिक,राजकीय,पुनर्वसनासाठी मंडल आयोगामार्फत ओबीसींना आरक्षण मिळाले होते,ते आरक्षण राज्य शासनाने केलेल्या वेळखाऊ धोरण व तारीख पे तारीख यामुळे ते रद्द झाले आहे,दिनांक 15 जून रोजी 'ओबीसी चे राजकीय आरक्षण बचाव कृत्ती समिती' ने, सर्व सामाजीक संघटना,सर्व राजकिय पक्षाचे ओबीसी नेते,कार्यकर्ते, नॉन पोलिटिकल ओबीसी,एससी,एसटी,सोशल फ्रंट च्या नेतृत्वात एकत्र येऊन,त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात,शासनाला निवेदन दिले,या वेळी महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित,होई पर्यंत औरंगाबाद माहापालिका निवडणुक घेण्यात येऊ नये,तसेच राज्या मधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेऊ नये, असे निवेदन दिले,त्यामध्ये प्रामुख्याने शासनाने तात्काळ इम्पेरिकल डेटा एकत्र करावा,ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली करावी, ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित झाले पाहिजे, राज्य सरकारने ओबीसींसाठी विशेष आयोग नेमून कालबद्ध कार्यक्रमा मार्फत ,लवकरात लवकर ओबीसींसाठी समाजा वर झालेला अन्याय दूर करावा,तसेच त्या आयोगाला महाराष्ट्रभर फिरण्यासाठी,अभ्यास करण्यासाठी,सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,जेणेकरून आयोग लवकरात लवकर रिपोर्ट तयार करेल व शासनास सादर करेल, त्यामुळे ओबीसी समाजाला राजकीय दृष्टिकोनातून न्याय मिळेल,आज महाराष्ट्र मधील सर्व ओबीसी,भटक्या जाती,जमाती चे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे, ते पुन्हा त्यांना मिळण्या साठी, आज शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेउन त्यांना निवेदन दिले, त्यासोबत शासकीय सेवेमधील कर्मचारी यांचे पदोन्नती मधील आरक्षण सरकारने पुनर्स्थापित करावे व आरक्षणानुसार त्यांना बढती देण्यात यावी असे देखील यावेळी निवेदनामध्ये नमूद करण्यात आले,सदर निवेदन महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री,श्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले,यावेळी सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटना ओबीसीच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी,लोकशाही मार्गाने शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा ईशारा दिला, ओबीसी,एन टी,व्हिजेएनटी ,समाजाला न्याय देण्यासाठी , कोरोणा नियमाचे पालन करून,तिव्र आंदोलन करण्यात करण्यात येईल हा ईशारा देण्यात आला.
या ओबीसी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सुदर्शन बोराडे अजित निंबाळकर मराठवाडा अध्यक्ष ओबीसी ब्रिगेड भाऊ शिंदे भाऊसाहेब शेंद्रे नाभिक मंडळ अध्यक्ष लातूर श्रीकांत मुद्दे जिल्हाध्यक्ष वडार समाज संघ मंगेश सुवर्णकार जिल्हाध्यक्ष लातूर ओबीसी पिछडा शोषित संघटना अनंत चौधरी प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी पिछडा शोषित संघटना दिलीप पिनाटे जिल्हा अध्यक्ष ओबीसी ब्रिगेड लातूर









Comments