top of page

औरंगाबाद चे पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार यांची नागपूर ला बदली ...त्यांच्या जागी निखिल गुप्ता

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 8, 2020
  • 1 min read

ree

औरंगाबादचे नवीन पोलीस आयुक्त निखील गुप्ता, चिरंजीव प्रसाद यांची नागपूरला बदली…!

औरंगाबाद, 3 सप्टेंबर - प्रतिनिधी - गणेश चौधरी ( CT INDIA NEWS) औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र येथे झाली आहे. त्यांची जागा आता निखील गुप्ता नवीन पोलीस आयुक्तांची सुत्रे हाती घेणार आहे. औरंगाबाद विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कुमार सिंघल यांची बदली नियंत्रक, वैद्यमापन शास्त्र, मुंबई येथे बदली झाली आहे त्यांच्या जागेवर के. ए.एम.प्रसन्ना विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद येथे बदली झाली आहे. त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर येथून बदली झाली आहे. चिरंजीव प्रसाद यांनी वर्ष 2018 ला औरंगाबाद पोलीस आयुक्तांची जवाबदारी सांभाळली होती. त्यावेळी नुकतीच शहरातील शाहगंज येथे दंगल झाली होती शहरात त्यांनी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. शहराची दंगलची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला. कचरा प्रश्न पेटला असता कायदा सुव्यवस्था खराब होवू दिली नाही. कम्युनिटी पोलीसिंग हा उपक्रम स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून घेवून हजारो बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. महीला, सुशिक्षित व होतकरुंना विविध कोर्सच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न मिटवला. कोरोनाच्या काळात कडक लॉकडाऊन यशस्वी करुन पोलीसांची भीती सामान्य नागरिकांच्या मनातून काढून गरजूंना व रुग्णांना पोलीसांनी समाजसेवकांच्या सोबत समन्वय साधत मदतीचा हात दिला. शहरातील नागरिकांची भावना होती की चिरंजीव प्रसाद यांची बदली करु नये पण आज त्यांच्या बदलीचे शासनाकडून आदेश निघाले व धक्काच बसला. आयपिएस निखिल गुप्ता यांना दहा ते बारा वर्षापूर्वी औरंगाबाद शहरात डिसीपी म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.

Comments


bottom of page