top of page

औरंगाबाद जिल्हा पत्रकार संघ श्री आरती

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 6, 2019
  • 1 min read

ree

औरंगाबाद प्रतिनिधी,श्रीगणेश ही देवता विघ्न हरण करणारी देवता आहे.वर्षात अनेक संकटे येत असतात ही संकटे श्रीगणेश दुर करतात.संकट निवारणाचे साकडे गणेशाला घातले पाहिजे.औरंगाबाद जिल्हा पत्रकार गणेश मंडळाच्या श्रींची आरती शिक्षण तज्ज्ञ श्री.प्रदिप दुबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली होती.या प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलतांना ते म्हणाले की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली होती.औरंगाबाद शहरातील ही पत्रकारांनी एकत्र येऊन ही परंपरा कायम ठेवली आहे.महाराष्ट्रात पत्रकारांनी गणरायाची स्थापना केली आहे मी प्रथम बघतो आहे.औरंगाबाद जिल्ह पत्रकार गणेश मंडळाने चांगला उपक्रम सुरू केला असून माझ्या मनपुर्वक शुभेच्छा आहे.औरंगाबाद जिल्हा पत्रकार गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष गणेश पवार,संजय हिंगोलीकर यांनी त्यांचा सत्कार केला.सचिन अंभोरे यांनी सुत्रसंचालन केले होते.कोषाध्यक्ष राजु वाघमारे यांनी आभार मानले.या प्रसंगी सचिव कल्याण अन्नपुर्ण,सदस्य अरूण सुरडकर,जेष्ठ पत्रकार जगन्नाथ सुपेकर,राजेंद्र अजमेरा,विनोद कांबळे,विजय अवसरमोल,देवीदास कोळेकर,आदींची उपस्थिती होती.

Comments


bottom of page