top of page

औरंगाबादेत उच्चभ्रू वसाहतीत सुरू होता 'कुंटणखाना', या बड्या आसामीला अटक

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Dec 12, 2019
  • 1 min read

ree

औरंगाबाद,: वार्ताहार-उमेश आव्हाळे आणि सागर खंडागळे शहरातील उच्चभ्रू वसाहतीत सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बीड बायपास परिसरात चालणारे सेक्स रॅकेटवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून तीन महिला दलालांसह चार ग्राहकांना अटक केली आहे. अटक केलेल्या ग्राहकांमध्ये शहरातील प्रसिद्ध मॉलच्या मॅनेजरचा समावेश आहे. चार तरुणीची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.मिळालेली माहिती अशी की, शहरातील बीड बायपास परिसरातील राजेश नगरात राहणारे संजय कापसे आणि एक महिला परराज्यातील महिलांना डांबून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एका रो-हाऊस आणि एका बंगल्यात हा गोरखधंदा मागील काही दिवसांपासून सुरू होता. वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणींमध्ये दोन आसाम, एक हैदराबाद आणि एक स्थानिक तरुणीचा समावेश आहे.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे....परराज्यातील महिलांना घरात डांबून आरोपी सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अजय सुभाष साळवे (वय-23), ज्ञानेश्वर सर्जेराव जराड (वय- 42), मोहम्मद साजिद अली (वय-29) आणि अमोल दामू शेजुळ (वय-29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळावरून विदेशी मद्याचे 10 बॉक्स जप्त केले आहेत. याची किंमत सुमारे एक लाख 44 हजार 930 आहे. कारवाई दरम्यान सापडलेल्या महिलांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. याबाबत पुंडलिक नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments


bottom of page