औरंगाबाद मधील रेड्डी कंपनी कामगाराची काळजी घेत नाही
- CT INDIA NEWS

- May 12, 2020
- 1 min read

वार्ताहार-सागर खंडागळे (औरंगाबाद) कोविड-१९ या महाभयंकर आजारांशी कंत्राटी सफाई (रेड्डी कंपनीचे)कामगार दोन हात करून नागरिकांना सेवा बजावत आहे. स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून प्रशासनाला सहकार्य करत आहे.परंतु या सफाई कामगारांच्या आरोग्यासाठी रेड्डी प्रशासन कोणतेही पावलं उचलत नाही. उदा. १)रेड्डी कंपनीचे सफाई कामगार काम करत असताना(सफाई आरोग्याच्या)निर्देशनानुसार गमबुट, मास्क,हॅन्डग्लोज,सॅनिटायजर संपूर्ण पी-पी किट इ. सुरक्षा साधने देण्यात येत नाही. २)या कोविड-१९ लॉकडाऊनच्या काळामध्ये अन्न-धान्य पूर्णपणे सफाई कामगारांना पोहचलेली नाही तरी सुद्धा स्वतःच्या जीवाशी खेळून रेड्डी कंपनीच्या प्रशासनाला सहकार्य करीत आहे. ३)तरी सुद्धा झोन क्र.०४ वरिष्ठ (झोनर)हे कर्मचाऱ्यांवर दबाव आणून यांच्याकडून दुपारी २:००वाजेपर्यंत काम करून घेत आहे. * कमर्शल मार्केट कोविड-१९ च्या लॉकडाऊन काळामध्ये पूर्णपणे बंद असून कमर्शल मार्केट मधील ओला व सुखा कचरा हा पूर्णपणे घंटा गाडीमध्ये येत नसून,रेसिडेन्सी एरियामधील कचरा पूर्णपणे घेत असून कमी वेळाध्ये कर्मचारी घंटागाडी आप आपल्या वेळे प्रमाणे पोहचत आहे.तरी सुद्धा झोनर अधिकारी यांनी ड्रायव्हर-लेबर वर दडपण टाकू नये. रेड्डी कंपनीचे सफाई मजूर हे गेल्या दोन महिन्यांपासून विना-पगारी काम करीत असून हे कर्मचारी गरीब घरातून असल्यामुळे यांचा उधरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण निकाली काढण्यात यावा. माननीय.आयुक्त आणि घन कचरा प्रमुख साहेबांनी या संपूर्ण प्रकर्णावरती लक्षकेंद्रित करण्याची गरज आहे.जेणे करून औरंगाबाद शहराचे सफाई काम सुरळीत पणे पार पडेल. सिटी न्यूज इंडिया औरंगाबाद. सागर खंडागळे (न्यूज रिपोर्टर)







Comments