औरंगाबाद येथिल लाचखोर पोलीस अधिकारी यांना अटक
- CT INDIA NEWS

- Jun 15, 2020
- 1 min read

वार्ताहार-गणेश चौधरी-औरंगाबाद-गौण खनिजांच्या वाहनावर कारवाई न करण्यसाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकातिल आरटीपीसिने 30 हजाराची लाज घेतली. सापळा रचलेल्या पथकाने झडप मारताच लाचखोर पोलिसाने अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना चरडण्याचा प्रयत्न केला..दिनांक-12-06-2020शुक्रवारी रोजी ही घटना घडली सावंगी चौफुली जवळ घडली कर्मचाऱ्यने लाचेची रक्कम सह वाहन घेऊन पोबारा केला एसिबीच्या पथकाने त्यांच्या अन्य एक साथीदाराला अटक केली आहे..रामेश्वर कैलास चेडेकर असे अटक करण्यात आलेले कर्मचारी यांचे नाव आहे ..अनिल रघुनाथ जायभय हे रक्कम घेऊन फरार आहेत...
सावंगी येथिल क्रॅशर मधील डब्बार आणि खडी ची जड वाहतूक करण्यावर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नेहुल यांनी कारवाईला सुरुवात केली होती .चिकलठाणा आणि फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्याचा आरटीपीसि असलेल्या रामेश्वर चेडेकर आणि पोलीस कार्यालयातील शिपाई अनिल जयभाय याने एक वाहनांसाठी 30 तीस हजार रुपयांची मागणी केली होती ..या वरून तक्रार दराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केली होती..या वरून लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक श्री डॉ अरविंद चावरीय यांच्या पथकाने शहानिशा केली दरम्यान तक्रार दार आणि पोलीस यांच्या कॉल रेकॉर्डिंग वरून सापळा रचण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली
विशेष म्हणून पोलीस निरीक्षक श्री राजपूत साहेब यांच्या अंगावर बुलेरो कार घालण्यात आली त्यात श्री राजपूत साहेब थोडक्यात वाचले....







Comments