top of page

औरंगाबाद : रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा रोजगार निर्मितीतील मॉडेल तयार करण्याच्य

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 22, 2021
  • 1 min read

प्रतिनिधी- सागर खंडागळे औरंगाबाद

औरंगाबाद : रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा रोजगार निर्मितीतील मॉडेल तयार करण्याच्यादृष्टीने प्रत्येक गावात महिनानिहाय नियोजन करून रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी दिल्या.


औरंगाबाद पंचायत समिती कार्यालयात मग्रारोहयो नियोजन व आढावा बैठक मंत्री भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळकेसह आदींची उपस्थिती होती. भूमरे यावेळी म्हणाले, की मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या कामांपैकी काही कामे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात करता येऊ शकतात. त्यानुसार नियोजन करून वर्षभरात जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत कमीत कमी दोन सार्वजनिक कामे सुरू करावेत.

तसेच किमान पाच वैयक्तिक लाभाची कामे सुरू राहिली पाहिजेत, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची दखल घेण्यात येऊन. शासन त्यांच्या पाठिशी आहे.


तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही या वेळी दिले. ग्रामसेवक, कृषी सहायकांनी मनरेगाअंतर्गतच्या कामांना प्राधान्य देऊन अधिकाधिक कामे करण्यावर भर देऊन मोठ्या प्रमाणात कामे करावीत. दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतींनीही यात पुढाकार घ्यावा, अशा सुचनाही भूमरे यांनी केल्या.या बैठकीस जिल्हा परिषद गट आडगाव बु. पिंप्री राजा, गोलटगाव, करमाडमधील ग्रामस्थ, पदाधिकारी, जिल्हा गटातील सदस्य, पंचायत समिती गटातील सदस्यांची माेठी उपस्थिती होती.

Comments


bottom of page