औरंगाबाद रेल्वे_स्टेशन येथे नांदेड डीव्हीजन चे डी.आर .एम यांची आढावा बैठक संपन्न
- CT INDIA NEWS

- Sep 12, 2020
- 1 min read

प्रतिनिधी - गणेश चौधरी - औरंगाबाद
औरंगाबाद रेल्वे_स्टेशन
नांदेड डीव्हीजन चे डी.आर .एम डीव्हीजनल रेल्वे मॅनेजर श्री उपेंद्र सिंह जी आढावा बैठकी साठी औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे आले होते , बैठकीमध्ये रेल्वे संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा झाली यात कुणाल मराठे- पाटील यांची ही उपस्तीतीत होती..
सातत्याने आपण बघितले औरंगाबाद (संभाजीनगर)ला दुजाभाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यासंदर्भात कडक शब्दांमध्ये त्यांना विनंती केली व मागण्या आहेत त्या त्यातकाळ पूर्ण करायला सांगितल्या पीट लाईन चा आणि डब्लिंग इलेक्ट्रिशन चा प्रश्न आहे त्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा ऑफिस च्या माध्यमातून आपण रेल्वेमंत्र्यांना पाठवावा असे त्यांना सांगण्यात आलं व लवकरच मी अधिवेशनाचा काळामध्ये रेल्वेमंत्री पियुष गोयल साहेबांना भेटून या सर्व मागण्या निवेदन देणार आहे
आणि येणाऱ्या काही दिवसात त्यावर विविध उपाय योजना करून ते प्रश्न मार्गी लावण्यात येतील !!
पुढील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आज साहेबांसमोर निवेदन देण्यात आले !
१.औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशन चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे !
२.औरंगाबाद रेल्वे स्थानकावर भारतीय तिरंगा ध्वज नक्की असावा !
३.औरंगाबाद वरून महत्त्वपूर्ण शहरे जसे की बंगलोर , चेन्नई , जयपूर , गोवा , सुरत , कोलकत्ता , लखनऊ , अहमदाबाद , दिल्ली जोडण्यात यावी !
४.रेल्वे रूळ दुपद्री करण आणि त्यांचे इलेक्ट्रिकफिकॅशन नांदेड आणि मुंबई अंतरात लवकरात लवकर करण्यात यावे !
५.औरंगाबाद ते चाळीसगाव फक्त ८८ किमी आहे , त्याचे जोडणीकरण लवकर पूर्ण करावे !
६.औरंगाबाद रेल्वे स्थानकावर
" पिट लाईन कनेक्शन " करण्यात यावे जेणेकरून आपले औरंगाबाद शहर दुसऱ्या महत्वपूर्ण शहरांसोबत जोडले जाईल !
७.सर्व महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्या मुकुंदवाडी , लासूर , रोटेगाव येथे प्रवाशांच्या सोयीसाठी थांबल्या पाहिजे !
८. एक स्वतंत्र रेल्वे समिती , कोंकण रेल्वे समिती च्या धर्ती वर मराठवाडा रेल्वे विकासासाठी स्थापन केली पाहिजे !
९.जनशताब्दी एक्स्प्रेस दादर पासून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकापर्यंत पुढे वाढवली पाहिजे







Comments