औरंगाबाद - शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना नागरीक अजिबात काळजी घ्यायला तयार नाहीत. याची
- CT India News
- Mar 1, 2021
- 1 min read
प्रतिनिधी- सागर खंडागळे
औरंगाबाद - शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना नागरीक अजिबात काळजी घ्यायला तयार नाहीत. याची प्रचिती रात्री महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांना हिमायतबाग चौकात आली. चौकातील चायनीज, चहा विक्रेते आणि हॉटेलवर मास्क न घातलेली अलोट गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे आज सकाळी या भागातील तीन लोखंडी टपऱ्या, पाच शेड अतिक्रमण हटाव विभागाने जमीनदोस्त केले. मास्क न लावलेल्या नागरिकांवरही या ठिकाणी कारवाई करण्यात आली.









Comments