औरंगाबाद शहरात सणासुदीच्या काळात नळांना हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे पाणी
- CT INDIA NEWS

- Sep 9, 2019
- 1 min read

वार्ताहर-सागर खंडागळे.. औरंगाबाद नागरिकाच्या जीवाशी खेळ:डाव्या कालव्यालगतच्या इतर योजनांनादेखील धरणातील पाणी,परंतु ते शुद्ध आणि शहराला अशुद्ध का? औरंगाबाद शहरात सणासुदीच्या काळात नळांना हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे पाणी येत असल्याने नागरिकाची धांदल उडते आहे. सदरील पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरिकांना जार मागवून तहान भागवावी लागत आहे.जायकवाडीत पाणीसाठाच हिरवा झाल्याने सांगून महानगरपालिका हाथ झटकत आहे....तरी याकडे अधिकारी आणि महानगरपालिका कर्मचारी यांनी लक्ष द्यावे... ही घटना सिटी न्युज चे प्रतिनिधी श्री.सागर खंडागळे याच्या कडे स्थानिक रहिवाश्यानी मांडली.







Comments