#केंद्रातील_भाजप_सरकारच्या_विरोधात चाळीसगाव येथे #इंधन_गॅस_दरवाढीविरोधात_राष्ट्रवादी_काँग्रेसतर्फे व
- CT India News
- Jul 7, 2021
- 2 min read
चाळीसगाव तालुका प्रतिनीधी विकी पानकर, मो 8605074861. #केंद्रातील_भाजप_सरकारच्या_विरोधात चाळीसगाव येथे #इंधन_गॅस_दरवाढीविरोधात_राष्ट्रवादी_काँग्रेसतर्फे वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर #निदर्शने
तालुक्याचे मा.आ.दादासो.राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनात आज राष्ट्रवादी काँग्रेसने विविध पंपांवर निदर्शने करून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला
चाळीसगाव :- गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्य तेल व इतर जिवनाश्यक वस्तूंच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे या दरवाढी विरोधात चाळीसगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेसने जयशंकर पंप येथे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये, खिसे मे पैसे बचने लगे..?' या भाषणाच्या ध्वनिफितीचा पेट्रोल पंपावर साऊंड सिस्टिम द्वारे वारंवार रेकॉर्डिंग वाजवण्यात आले त्यामुळे पंपावरील पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेला ग्राहकांची चांगलीच करमणूक झाली या गमतीदार आंदोलनामुळे पेट्रोल व डिझेल भरणारे वाहनचालक यांनी स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदविल्या त्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया आंदोलनात उमटल्या याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्ह्याचे जि.प.गटनेते शशीभाऊ साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पं.स. सभापती अजय पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख ईश्वर ठाकरे, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, दीपक पाटील, श्याम देशमुख, बंटी ठाकूर, हरीनाना जाधव,भय्यासाहेब पाटील, शिवाजी आमले, शिवाजी सोनवणे, जिभाऊ आधार पाटील, सतीश महाजन, अरुण पाटील, भाऊसाहेब केदार, राकेश नेवे,योगेश पाटील, विजय शितोळे, प्रकाश पाटील, सुरेश पगारे, जयसिंग भोसले, राजू जाट, दिनेश महाजन, मिलिंद शेलार,सुशील आमले, बाळू खत्ती, बाजीराव दौंड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसतर्फे घाटे पंप येथे अशाच पद्धतीने मा.पंतप्रधान मोदींच्या क्लिप्स ऐकवत गुलाबपुष्प देऊन व पेढे वाटून पेट्रोल दरवाढीबद्दल ग्राहकांचे अभिनंदन केले तर चरण पेट्रोल पंपावर मोटरसायकलची अंत्ययात्राच काढण्यात आली, यात प्रतिकात्मक स्वरूपात वाहन मृतदेह मानून जोरदार घोषणाबाजी करत अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यात आले
घोषणाबाजीने परिसर दणाणून टाकत केलेले हे आंदोलन नगरवासियांचे लक्ष वेधणारे ठरले
या आंदोलनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहित भोसले, शहराध्यक्ष शुभम पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव पाटील, प्रदेश समन्वयक सौरभ त्रिभुवन, जिल्हा प्रवक्ते आकाश पाटील, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, पीपल्स सोशल फाउंडेशन अध्यक्ष आकाश पोळ, युवक उपाध्यक्ष राकेश बिडे,अतुल चौधरी,कुणाल पाटील,अभिजित ठोके, बंटी पाटील, विशाल चौधरी, प्रवीण जाधव, शिवसागर पाटील, पंजाबराव देशमुख, विकास बोंढारे, पवन वाघ, सिद्धार्थ देशमुख, हेमंत जाट, लवेश राजपूत, भुषण पाटील, तुषार सोनवणे, धीरज पाटील, शुभम मोरे, विकास जाधव, बाळासाहेब पोळ, प्रकाश पाटील, गौरव देशमुख, गौरव पाटील, प्रसाद देशमुख, गोलू राजपूत, असलम पिंजारी, कुशल सैंदाणे, हर्षल बोरसे, रोशन चव्हाण, संतोष पाटील, भूषण मोघे, विकी कछवा, आकाश कासार, कुणाल पाटील, सोनू अहिरे, खुषाल गवारे, रुद्रतेज शेलार व असंख्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते.











Comments