कंपनीत पाणी पुरवठा करण्यावरून वाद ...एकाचा मृत्यू
- CT India News
- May 17, 2021
- 1 min read

सचिन चौधरी महाराष्ट्र ब्युरो चीफ सिटी इंडिया न्युज
धक्कादायक! भररस्त्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या; पुणेकर पाहत राहिले….
कंपनीत पाणी पुरवठा करण्यावरून वाद
दि 14 मे 2021 रोजी पुण्यात भरदिवसा रस्त्यात कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औद्योगिक वसाहत चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे कंपनीत पाणी पुरवठा करण्याच्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आली. अतुल तानाजी भोसले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये निर्घृणपणे हत्या केली जात असल्याचं दिसत आहे.
हत्या झालेला अतुल भोसले हा म्हाळुंगे परिसरातील एका कंपनीत दोन टँकरने पाणी पुरवठा करत होता. दरम्यान, कंपनीत पाणी पुरवठा करण्यावरून आरोपी अक्षय शिवले याने मयत अतुल भोसले याना फोन करून मला त्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे असे सांगितले. यावरून त्यांच्यात फोनवरच वाद झाला होता अशी माहिती पोलीस अधिकारी अरविंद पवार यांनी दिली आहे.
त्यानंतर दुपारच्या सुमारास म्हाळुंगे येथील ममता स्वीट दुकानासमोर अतुल भोसले याला गाठून त्याच्यावर इतर साथीदारांच्या मदतीने कोयत्याने वार केले. अतुल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे अशी माहिती म्हाळुंगे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि इतर तीन साथीदार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







Comments