*कारंजा येथे जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षीरसागर यांची भेट* कारंजा (घा )/प्रतिनिधी कारंजा( घा ):-लवकरच
- CT India News
- Mar 7, 2022
- 1 min read
*कारंजा येथे जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षीरसागर यांची भेट*
कारंजा (घा )/प्रतिनिधी
कारंजा( घा ):-लवकरच होऊ घातलेल्या पंचायत समिती ,जिल्हापरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्ष व कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून येत आहे .संभाजी ब्रिगेड चे नेते तथा वर्धा जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षीरसागर यांनी सुद्धा काल शहरास भेट देऊन संभाजी ब्रिगेड पक्षाच्यावतीने पंचायत समिती, जिल्हापरिषद लढविण्यासंदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांची काय रणनीती राहील हे जाणून घेतले .यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली .येत्या पंचायत समिती, जिल्हापरिषद निवडणुकीत संभाजी ब्रिगेड चे युवा नेतृत्व स्थानीक नेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड पक्ष आपले उमेदवार योग्य त्या जागांवर आपल्या पूर्ण ताकदीने लढवेल असा निर्धार सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी केला .
Comments