*कारंजा येथे महाशिवरात्री मोहोत्सव संपन्न* कारंजा( घा )/प्रतिनिधी कारंजा( घा ):- कारंजा शहरातील
- CT India News
- Mar 8, 2022
- 1 min read
*कारंजा येथे महाशिवरात्री मोहोत्सव संपन्न*
कारंजा( घा )/प्रतिनिधी
कारंजा( घा ):-
कारंजा शहरातील प्रजापिता ईश्वरीय विद्यालय मेन रोड कारंजा घाडगे तर्फे महाशिवरात्री पर्व उत्साहात साजरा करण्यात आला .परमपीता शिव परमात्मा यांचा आत्मिक संदेश संपूर्ण विश्वात पोचविण्यासाठी संगीतकार दादीजी यांच्या शुभ हस्ते शिव ध्वजारोहण करण्यात आले .गुलाबाच्या फुलाने पुष्पवर्षाव करण्यात आला .संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देण्यात आला .कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर किरण भुयार यांनी केले .तसेच आभार उमेश पाचपोहर यांनी मानले .यावेळी प्रमुख उपस्थिती इंद्रकुमार मोटवणी ,प्रकाश चौधरी ,गुणवंत मुडे ,नासरे माताजी ,माधुरी बेहन ,बरांगे काका ,सुभाष अंधारे ,पियुष रेवतकर ,प्रकाश चौधरी ,सोहन टूले ,निलेश भुयार ,विनोद धंडारे ,नारिंगे माताजी ,मनोज वानखेडे ,सतीश काळे ,गंगाधर यावले आदी मान्यवर उपस्थित होते .









Comments