top of page

कळमसरा शिवारात वीज पडून बैल जोडी ठार..भरपाई ची मागणी

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 8, 2020
  • 1 min read

ree

प्रतिनिधी- निलेश चौधरी -

कळमसरे शिवारात विज पडून बैलजोडी ठार ( शेतकरी कुटुंब हतबल )

पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील भास्कर पंडित तेली यांची कळमसरा शिवारात नाक चापा शेती आहे ते शेतातच शेती अवजारे व बैलजोडी ठेवत असत

शुक्रवारी मध्यरात्री अचानक विजेच्या कडकडासह वादळवारा व पाऊस सुरु झाल्याने शेतातील झाडाखाली बांधलेल्या बैलजोडीवर विज पडून बैलगाडी ठार झाली यात शेतकऱ्याचे एक लाख तिस हजार रुपये नुकसान झाल्याचे खात्रीलायक समजते

या बाबत शेतकरी भास्कर तेली यांच्याशी संवाद साधला असता त्यांची कळमसरा शिवारात नाक चापा शिवारात शेती असून ते बैलजोडीस शेतातच बांधत असत परंतु शुक्रवारी झालेल्या विजेच्या कडाकडाट व वादळी पावसात झाडाखाली बांधलेल्या बैलजोडीवर विज पडून त्यात दोघे बैल जागीच ठार झाल्याने एक लाख तिस हजार रुपये किमतीची जोडी ठर झाल्याचे सांगतांना शेतकऱ्याला रडू कोसळले

हि बैलजोडी पेरणी झाल्यावर वरखेडी बाजारात विकण्यासाठी नेली होती तेव्हा व्यापाऱ्याने एक लाख तिस हजारात मागीतली होती परंतु पुढच्या बाजारी जास्त किंमतीत विकली जाईल या आशेने बैलजोडी विकली नाही परंतु लगेचच लॉगडाऊन सुरु झाले व बाजार बंद झाल्याने आर्थिक अडचणीत असल्यावरही बैलजोडी विकता आली नाही व यातच ही घटना घडल्याने शेतकरी कुटुंब हवालदिल झाले असून निसर्गाचा लहरीपणामुळे व लॉगडाऊन असल्याने शेती करुन कुटुंबाचा गाडा ओढणे नाकीनऊ आला असतांनाच पुन्हा हे नुकसान झाले आहे

तरी या शेतकऱ्याला शासनाने त्वरीत आर्थ मदत द्यावी अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे

C T INDIA NEWS

REPORTER Nilesh chaudhari. Muktainager

Comments


bottom of page