top of page

खान्देश कन्या कानुबाई.. मातेच्या ओवीच्या गायणातून शाहीर विठ्ठल महाजन यांनी केला जागर

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jul 30, 2020
  • 1 min read

ree

प्रतिनिधी-निलेश चौधरी-पाचोरा दि.२६ जुलै :

खानदेश कन्या कानुबाई' मातेच्या ओवींच्या गायनातून.. शाहीर विठ्ठल महाजन यांनी केला जागर.

"भोळी मनी कानबाई तुले नमस्कार " ओवी,

खानदेशात कानुबाई मातेचा सण श्रावण शुध्द नाग पंचमी नंतर येनाऱ्या रविवारी स्थापना करून व दुसऱ्या दिवशी सोमवारी विसर्जन होते. कानुबाई मातेचे माहेर हे खान्देश असून या दिवशी कानुबाई आपल्या माहेरी येते म्हणून मोठ्या उत्साहात हा सण घरोघरी साजरा केला जातो. शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन यांचे गुरू चाळीसगावकर श्री सुरेश गणपत चौधरी कानुबाईचे भगत व कै.एकनाथ दौलत महाजन पाचोरा यांच्या कडूनओवी गायनाचे व डफ,ढोलक वाद्याचे ज्ञान घेवून ही पंरमपरा कायम ठेवली आहे.श्री.संत सावता महाराज पंचरंगी ओवी मंडळ बाहेरपुरा पाचोरा जि.जळगाव या माध्यमातुन शाहीर विठ्ठल महाजन हे समाजातील ज्वंलत विषायांवर जनजागृती करत आहेत.त्यांच्या सोबत ऐकून दहा लोकांचा संच असतो. त्यात परिवारातील सदस्य आहेत. खानदेशी लोककलेचा प्रचार व प्रसार करुनओवी गायनाची कला जपण्याचे कार्य ते गेल्या तीन दशक पासुन करत आहेत.

Comments


bottom of page