top of page

*खान्देश तेली समाज महिला मंडळ जामनेर तालुका अध्यक्ष पदी स्वातीताई नरेश चौधरी यांची आणि सचिव पदी प्रा

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 7, 2022
  • 1 min read

*खान्देश तेली समाज महिला मंडळ जामनेर तालुका अध्यक्ष पदी स्वातीताई नरेश चौधरी यांची आणि सचिव पदी प्रा. योगिता ताई पांडुरंग चौधरी यांची निवड*


प्रतिनिधी :- सचिन चौधरी महा. ब्युरो चीफ सिटी इंडिया न्युज_ 9960040717


जामनेर - संपूर्ण जामनेर तालुक्यातील असलेले खानदेश तेली समाज मंडळ च्या महिला मंडळ च्या जामनेर तालुका अध्यक्षपदी जामनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई नरेश चौधरी यांची आणि जामनेर तालुका सचिव पदी शेंदुर्णी येथील प्रा. योगिता पांडुरंग चौधरी यांची निवड करण्यात आली. तेली समाजातील महिला संघटन मध्ये स्वातीताई चौधरी आणि योगिता ताई चौधरी यांचे भरीव योगदान असून त्या योगदानाचा विचार करून खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने जामनेर तालुका अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी यांच्या शिफारशीवरून नियुक्ती केलेली आहे.


स्वातीताई चौधरी आणि योगिता ताई चौधरी यांच्या नियुक्तीने खान्देश तेली समाज मंडळाच्या जामनेर तालुक्यामधील कार्यकारिणीच्या विस्तारामध्ये अजून वाढ होईल.त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून खान्देश तेली समाज महिला आघाडीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष सौ.सुनंदाताई चौधरी, धुळे जिल्हा अध्यक्ष सौ.मालती चौधरी, सचिव सौ.सविता चौधरी,कार्याध्यक्ष सौ.शुभांगी चौधरी, उपाध्यक्ष सौ. समीधा सूर्यवंशी, जामनेर तालुका सचिव विलास चौधरी, खजिनदार वासुदेव चौधरी, शहराध्यक्ष निलेश चौधरी, शेंदुर्णी अध्यक्ष सोपान चौधरी, चोपडा तालुका अध्यक्ष प्रकाश चौधरी यांच्यासह संपूर्ण खान्देशातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या भावी कार्यास व वाटचालीसाठी खान्देश तेली समाज मंडळाचे कार्याध्यक्ष मनोज चौधरी, उपाध्यक्ष जयवंत चौधरी, धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, तालुका अध्यक्ष भटू पुंडलीक चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments


bottom of page