गंगापूर तालुक्यतील लासुर स्टेशन येथल सावंगी चौकात दिनांक 06 फ्रब्रुवारील रोजी संध्याकाळी पाच वाजेच्
- CT India News
- Feb 7, 2022
- 1 min read
गंगापूर तालुक्यतील लासुर स्टेशन येथल सावंगी चौकात दिनांक 06 फ्रब्रुवारील रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिस ठाणे शिल्लेगाव हद्दीतील लासुर स्टेशन कडून सावंगी चौकाकडे मोटार सायकल चालक नामे नितीन दत्तात्रय जाधव हा,रा. लासुर स्टेशन हे मोटारसायकल ने जात असताना त्यांचे मोटार सायकलला ट्रॅक्टरने चालकाने धडक दिल्याने नमूद मोटार सायकल चालक यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचार कामी जवळील शिवना हॉस्पिटल लासुर स्टेशन येथे दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी नितीन जाधव यांना मयत घोषित केले. नमूद अपघात करणारे ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर घटनास्थळी न थांबवता तेथील गंगापूरचे दिशेने पळून गेला.पोलीस स्टेशन शिल्लेगाव चे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी प्रसंगावधान राखून स्टाफ यांना सदर ट्रॅक्टर चा तात्काळ शोध घेणे कामी रवाना करून नमूद ट्रॅक्टर क्रमांक MH 14,DH 4203 महिंद्रा अर्जुन लाल रंगाचे ट्रॅक्टर हे तांदुळवाडी येथे ताब्यात घेऊन पोलीसस्टेशन शिल्लेगाव येथे लावला आहे. नमूद ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पळून गेला आहे. शिल्लेगाव पोलीस पुढील कार्यवाही करीत आहे.
दरम्यान सावंगी चौकात कायम वाहतुकीची वर्दळ राहते त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी गावकर्यातून होत आहे.









Comments