top of page

गुणवंत व आदर्श विद्यार्थ्यांची पाठराखण करणार.

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 24, 2021
  • 2 min read

गुणवंत व आदर्श विद्यार्थ्यांची पाठराखण करणार.

प्रमोद खाडे

तडवळे प्रतिनिधी - भैरवनाथ कला क्रीडा व ग्रामविकास तरुण मंडळ व भैरवनाथ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष श्री प्रमोद खाडे गुरुजी यांनी तडवळे तालुका खटाव येथील श्री हनमंत मदने पर्यवेक्षक कृषी उत्पन्न मार्केट समिती वडूज यांचे चिरंजीव धैर्यशील हनमंत मदने यास बीएस्सी अँग्री ला प्रवेश मिळाल्याबद्दल त्याचा भैरवनाथ कला क्रीडा व भैरवनाथ शैक्षणिक संकुल व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार आयोजित केला होता .यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले तसेच पी डी पाटोळे, काकासो साबळे माजी उपसरपंच, आनंदराव पवार व्हाईस चेअरमन विकास सेवा सोसायटी, तसेच मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय नागरे पाटील ,बाळासाहेब खाडे गुरुवर्य ,शशिकांत साबळे, सदानंद साबळे ,पोपटराव सानप, नवनाथ साबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी प्रमोद खाडे पुढे म्हणाले की, शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून गुणवंत व गरजू होतकरू विद्यार्थ्यासाठी संकुलाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल तसेच या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी तन-मन-धन व मनाने एकत्र आल्यास तुमचे यश निश्चित साध्य होणार आहे त्यासाठी माता पिता गुरुजन यांनी जे आपल्यावर संस्कार केले आहेत त्याचा या स्पर्धेच्या युगामध्ये विसर पडता कामा नये असे ते म्हणाले यावेळी पोपटराव माळवे यांनी समस्त ग्रामस्थांच्या वतीने धैर्यशील मदने यांचे अभिनंदन केले व त्याच्या भावी शिक्षणासाठी त्याने खडतर प्रयत्न करून गावाचे नाव मोठे करावे असे ते म्हणाले तर आनंदराव पवार यांनी गौरवोद्गार करताना म्हणाले की तडवळे गाव हे सुसंस्कृत व ज्ञानी लोकांची गाव आहे आणि यातून चांगली फळे निर्माण होतात त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन शैक्षणिक संकुल यांच्या माध्यमातून मिळते याचा खरोखरच अभिमान वाटतो या कार्यक्रमासाठी धनंजय शिंगटे, जालिंदर साबळे, अमोल साबळे, पंढरीनाथ खाडे, विजय खाडे, बबन खाडे गुरुजी, नितीन खाडे अध्यक्ष शालेय शिक्षण समिती, तसेच शिक्षक बँकेचे संचालक जय प्रकाश साबळे कुमार साबळे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपटराव माळवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हणमंतराव मदने यांनी केले.



फोटो ओळी धैर्यशील मदने यांचा सत्कार करताना भैरवनाथ व शैक्षणिक संकुलाचे पदाधिकारी छाया जे के फोटो

Comments


bottom of page