ग्रामपंचायत आणि मागासवर्गीय ग्रामपंचायत आणि मागासवर्गीय
- CT India News
- Jan 21, 2021
- 2 min read
ग्रामपंचायत आणि मागासवर्गीय
ग्रामपंचायत आणि मागासवर्गीय
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचेकडून शासन परिपत्रक क्रमांक व्हिपीएम 2606/प्रक्र 4233/परा 4/22
मंत्रालय मुंबई 400032 दि 24/नोव्हेंबर 2006
ग्रामपंचायत त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 15 टक्के रक्कम प्रति वर्षी मागासवर्गीय वर्गातील लोकांच्या साठी खर्च केली पाहिजे असे आदेश दि 18 नोव्हेंबर 1989 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद. यांना देण्यात आले आहेत हा खर्च करत असताना कोणकोणत्या बाबी विचारात घ्यावा कोणत्या बाबींवर खर्च करू नये या सूचना उपरोक्त शासन आदेशानुसार जिल्हा परिषद यांना देण्यात आल्या आहेत
ग्रामपंचायत क्षेत्रात राहणा-या मागासवर्गीय जाती जमाती कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. 6400 पेक्षा अधिक आहे अशा व्यक्तिं किंवा कुटुंबांना अपात्र ठरविण्यात येते आहे दारिद्र्य रेषा ठरविण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा निकष वगळण्यात आला आहे त्याऐवजी राहणीमानानुसार 13 निकषादवारे मिळणार या गुणांकाआधारे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब ठरविण्यात आली आहेत त्यामुळे सदर आदेशात गरजेनुसार बदल करणे आवश्यक आहे
पात्र लाभार्थी निवडीकरिता रुपये 6400 हि वार्षिक उत्पन्न मर्यादा वगळण्यात येवून सर्व मागासवर्गीय कुटुंब जे दारिद्र्य रेषेखाली आहेत ते लाभार्थी ठरतील लाभार्थी चा प्राथमयक्रम हा त्यांना बी पी एल सर्वेक्षण प्राप्त गुणाकानुसारच असावा शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी वेळोवेळी ठरविण्यात येणारे निकष दि 18/नोव्हेंबर 199 चा शासन निर्णय लागू राहील
वरील सूचना लक्षात घेऊन त्यापुढे ग्रामपंचायतींनी त्यांच्या उत्पादनाच्या 15. टक्के भाग मागासवर्गीय जाती जमाती साठी खर्च करताना दारिद्र्य रेषेखालील सर्व मागासवर्गीय जाती जमाती यांना पात्र समजण्यात यावे वरिल सूचना लवकरात लवकर अमलात आणली जावी असे आदेश त्यावेळचे राज्यपाल यांनी दिले आहेत
परवा ग्रामपंचायत निवडणूक झाली आपण सर्वांनी आप आपल्या उमेदवारांना मत देवून निवडणून आणले पण ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सदस्य टीम यांचे काम काय आहे आपणास माहीत आहे नाही कोणत्या योजना देणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे
आपणास कोणते दाखले ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मिळतात रस्ता दिवा बत्ती. समाज मंदिर. पाण्याच्या टाक्या. व सर्व शासकीय योजना राबविल्या जातात का ? घरपट्टी पाणीपट्टी कोणत्या नियमानुसार वसूली केली जाते. महिन्याला कामांचा आढावा घेण्यासाठी मिटींग घेतलीं जाते का ? त्यात सर्वसामान्य माणसाला बोलावले जाते का ? महिला साठी कोणकोणत्या योजना राबविण्यात येतात याची माहिती आपणास असणे गरजेचे आहे
बांधकाम कामगार नोंदणी सुलभ व सुटसुटीत पध्दतीने होणेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे कडून २०/सप्टेंबर व १३ आक्टेबर २०१७ नुसार आपल्या गावात ग्रामपंचायत शेत्रात राहणारे बांधकाम कामगार यांना बांधकाम कामगार म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार ग्रामसेवक यांना देवून मंडळाने नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्याही ग्रामपंचायत क्षेत्रात बांधकाम कामगार यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास नकार देत असतील तर आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडे तक्रार अर्ज दाखल करा
आॅनलाइन पध्दतीने बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी
१/ आधार कार्ड झेरॉक्स
२/ तीन फोटो
३/ रेशन कार्ड वर नावे असणारी सर्व व्यक्तिची आधार कार्ड झेरॉक्स
४/ सवयंमघोषणा पत्र
५/ आधार संबंधित माहिती
६/ इंजिनिअर दाखला रजिस्ट्रेशन नंबर आवक जावक नंबर
कोणत्याही नेट कॅफे मध्ये नोंदणी करू शकता कोणीही जादा पैसयाची मागणी करत असेल तर कळवा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९
माहिती अधिकार असे शस्त्र आहे जे आपणास सर्व शासकीय आॅफिस मधील माहिती मिळविण्यासाठी मदत आहे









Comments