गेल्या दहा वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या देवी दाक्षायनी मंदिर परिसरात सिमेंट रस्त्याचे काम चालू...
- CT India News
- Feb 1, 2022
- 1 min read
गेल्या दहा वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या देवी दाक्षायनी मंदिर परिसरात सिमेंट रस्त्याचे काम चालू...
प्रतिनिधी- मनीष मुथा ,लासुर
जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोबरे यांच्या प्रयत्नाने पर्यटन विकास निधीतून पंचवीस लाख रुपये खर्चून दाक्षायानी मंदिराचा मुख्य रस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर.....
मराठवाड्याची कुलस्वामिनी असणाऱ्या देवी दाक्षायणी मंदिर परिसरातील मंदिर ते मुंबई/वैजापूरच्या मुख्य डांबरी रस्त्यापर्यंतच्या कामाला सुरुवात झाली असून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे त्यानंतर चारशे पन्नास मीटर डांबरीकरणाचे कामही प्रगतिपथावर आहे सदर काम जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले असून पंचवीस लाख रुपये खर्चून सदर विकासकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे गेल्या दहा वर्षापासून दुर्लक्षित असलेला रस्ता दर्जेदार होत असल्याने गावकरी व देवी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान मंगळवारी गावकऱ्यांसह जिल्हा परिषदचे असिटंट इंजिनिअर जि.डी.शेवाळे यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी सरपंचपती वसंतराव हुमे, देवी दक्षायनी संस्थाचे विश्वस्थ सुभानराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दीपक हरिचंद्रे,जगन झिंजुर्डे,नामदेव आगवणे,किरण वंजारे आदींसह पत्रकारांचीही उपस्थिती होती.
.................................................. ...............
पंकज ठोंबरे :- (जिल्हा परिषद सदस्य)लासुरगाव येथील देवी दाक्षयानी मंदिराच्या परिसरातील सिमेंट रस्ता व चारशे चाळीस मीटर डांबरीकरण रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून जिल्हा परिषदच्या पर्यटन विकास निधीतून पंचवीस लाख रुपये खर्च करून चालू असून आणखी दहा लाख रुपये खर्चून सिमेंट रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी प्रस्तावित आहे.
सुभानराव देशमुख (देवी दाक्षायनी संस्थान, विश्वस्थ)देवी संस्थानच्या परिसरातील रस्त्याचे काम दर्जेदार होत असून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक भक्तांत त्यामुळे आनंद व्यक्त होत आहे.









Comments