top of page

गॅस वितरकांकडून रोज होतेय ग्राहकांची आर्थिक लूट

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jul 23, 2019
  • 1 min read

ree

चाळीसगाव :- (उपसंपादक चा वि) सद्यस्थितीत चाळीसगावात जवळपास ७ ते ८ एजन्सी धारक असून घरगुती गॅस वितरणाची किंमत शासनाने ६३४ ₹ निर्धारित केले असून मात्र,प्रत्यक्षात ६५० ते ६७० ₹ तसेच ग्रामीण भागात ७०० रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. तसेच सर्व गॅस वितरक येथील जवळपास सर्वच वितरक १५ ते ३० तर ग्रामीण भागात ६० ते ७० रुपये वाढीव दराने गॅस हंडी वितरित करतांना दिसून येत आहे.शासनाचा अध्यादेश असून सुद्धा हा अतिरिक्त बेहोशोबी भार ग्राहकांच्या खिश्यावर येत आहे.तसेच घरपोच गॅस हंडी न आल्यास ग्राहकाने एजन्सी धारकाच्या गोडाऊन वर जाऊन गॅस हंडी घेतल्यास रुपये ८ हे रेबिट करण्याचे प्रावधान सुद्धा आहे.आता ह्या बेहिशोबी गॅस एजन्सीच्या भोंगळ कारभाराकडे तहसीलदार तसेच कंपनीचे सेल्स मॅनेजर यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ही आर्थिक लूट लवकरात लवकर बंद करावी अशी नागरिकांतून भावना व्यक्त होत आहे.

Comments


bottom of page