top of page

गरुड महाविद्यालय शेंदुर्णीच्या प्रा. डॉ. योगिता चौधरी  राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत प्रथम शेंदुर्

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 1, 2022
  • 1 min read

गरुड महाविद्यालय शेंदुर्णीच्या प्रा. डॉ. योगिता चौधरी  राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत प्रथम


शेंदुर्णी प्रतिनिधी सचिन चौधरी महा ब्युरो चीफ सिटी इंडिया न्युज

महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समिती आणि गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव  यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत खुल्या गटात  डॉ. योगिता पांडुरंग चौधरी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. जागर स्त्री-पुरुष समानतेचा या उपक्रमा अंतर्गत 3 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . त्यासाठी सहभागी स्पर्धकांना एकविसाव्या शतकातील मी जिजाऊ हा विषय कविता करण्यासाठी देण्यात आला होता. सदर विषयाला घेऊन एकविसाव्या शतकातलं सर्वात मोठ संकट म्हणजे कोरोना आणि त्या कोरोणाच्या परिस्थितीत शिक्षणाची झालेली वाताहात - या वाताहातीत एका महिला शिक्षिकेची भूमिका आपल्या"एकविसाव्या शतकातील जिजाऊ शिक्षिका मी" या कवितेतून मांडत डॉ. योगिता चौधरी यांनी परीक्षकांची मते जिंकली. पारितोषिकाच्या स्वरूपात रोख रुपये 1500, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. महाराष्ट्रभरातून खुल्या गटातून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. याआधीही राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत त्यांनी दोन वेळेला पारितोषिक प्राप्त केले आहे. त्याचप्रमाणे  छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय  काव्य स्पर्धेत सुद्धा त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.

सदर यशासाठी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड, सचिव श्री. सतीश चन्द्र काशीद , संचालिका सौ. उज्वलाताई काशीद, सहसचिव श्री. दीपक भाऊसाहेब गरुड, वसतिगृह सचिव श्री. कैलास भाऊसाहेब देशमुख, सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वासुदेव आर पाटील , सर्व उपप्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

Comments


bottom of page