top of page

*गळफास घेत संपविले जीवन* कारंजा( घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर . कारंजा (घाडगे ):तालुक्यातील मोर्श

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 3, 2022
  • 1 min read

*गळफास घेत संपविले जीवन*


कारंजा( घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर .


कारंजा (घाडगे ):तालुक्यातील मोर्शी येथील 30 वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली .ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली .छत्रपती देविदास खवशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे .छत्रपती खवशी हा मागील बारा वर्षांपासून नागपूर येथे पत्नी व तीन मुलांसह राहत होता .घर बांधकामाचे काम करणारा छत्रपती हा अधूनमधून आपल्या मोर्शी या मूळ गावी यायचा .नुकताच त्याने नागपूर येथे एक भूखंड खरेदी केला .याच भूखंडाचे पैसे जुळत नसल्याने मागील काही दिवसांपासून तो विवंचनेत होता .अशातच मोर्शी येथे आलेल्या छत्रपती ने नारा मार्गावरील एआरसी पब्लिक स्कूल जवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली .याप्रकरणी कारंजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून ,पुढील तपास सुरू आहे .

Comments


bottom of page