चालीसगाव तालुक्यलील, चीतेगाव येथे आदिवासी बांधवांसाठी राज्य सरकारने आणलेले"खावटी" योजने अंतर्गत जीव
- CT India News
- Jul 19, 2021
- 1 min read
*चाळीसगाव तालुका प्रतिनिधी ( पत्रकार ) विकी पानकर बातमी साठी संपर्क साधा 24 on मो 8605074861..,*
चालीसगाव तालुक्यलील, चीतेगाव येथे आदिवासी बांधवांसाठी राज्य सरकारने आणलेले"खावटी" योजने अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ग्रामपंचायीमार्फत करण्यात आले .
कार्यक्रम सौ. प्रभावती सुभाष गायकवाड,सरपंच चितेगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर मंडळीची उपस्थिती होती, प्रशासनातर्फे सर्वश्री, कापडणीस सर,नाना गायकवाड, देसले सर, श्रीमती भामरे मॅडम यांनी परिश्रम करून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,व उपस्थित गावकरी,व मान्यवरांच्या हस्ते चितेगाव व श्यामवाडी येथील ७३ लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात रुपये २०००/ आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी आदिवासी बांधवांसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी, भारत सोनवणे,किरण जाधव, बंटी भोसले, पंकज देसले यांनी परिश्रम घेतले होते त्यांचा विशेष सत्कार सौ. प्रभावती गायकवाड यांनी याप्रसंगी केला. श्री.सागर देशमुख यांनी स्वखर्चाने शिक्षक वृंद, मान्यवर, उपस्थित गावकरी यांचे फराळ पाणी आणि मांडवाची व्यवस्था केली. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सर्वश्री, गजानन गायकवाड, भारत सोनवणे,(उपसरपंच)निवृत्ती कवडे,सुनीलमामा मोरे,नाना पवार,दिनेश भोसले,बाबासाहेब चांगदेव मोरे,किरण जाधव तसेच ग्रामपंचायत शिपाई अनिल मर साळे यांनी परिश्रम घेतले, सूत्र संचालक श्री.राजेंद्र मामा कवडे यांनी केले.









Comments