चाळीसगाव तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींचे व
- CT India News
- Feb 5, 2022
- 1 min read
_चाळीसगाव ता. प्रतिनिधी : विकी पानकर
*चाळीसगाव तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींचे विभाजन*
चाळीसगाव तालुक्यातील विभाजनासाठी बहुप्रतीक्षित असलेल्या ग्रामपंचायती तळेगाव- कृष्णानगर, लोंजे- अंबेहोळ व चिंचगव्हाण- सुंदरनगर या ग्रामपंचायतींनी वेळोवेळी ग्रामविकासासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतींनी निर्मिती व्हावी अशी वेळी वेळी मागणी तालुक्याचे मा.आमदार दादासो.राजीव देशमुख यांच्याकडे केली होती, त्यासंदर्भात ग्रामविकासमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून मा. उपुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने या ग्रामपंचायती स्वतंत्र निर्मित करण्यात आल्या.
तसा आदेश ग्रामविकास विभागामार्फत प्राप्त झाला असून ग्रामस्थांनी राजीवदादा देशमुख यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, सुभाष राठोड, बळीराम चव्हाण, अरुण राठोड, सुरेश चव्हाण, संतोष राठोड, युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले, शहराध्यक्ष शुभम पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव पाटील, पंजाबराव देशमुख,आदी उपस्थित होते.,









Comments