चाळीसगाव शहर हद्दीमधील तितुर व डोंगरी नदीपात
- CT India News
- Feb 28, 2022
- 1 min read
_चाळीसगाव ता. प्रतिनिधी : विकी पानकर मो. 8605074861_
*चाळीसगाव शहर हद्दीमधील तितुर व डोंगरी नदीपात्रातील बेकायदेशीर अतिक्रमण काढणे बाबत.*
चाळीसगाव - चाळीसगाव नगरपरिषद हद्दीमधील डोंगरी व तितुर नदी पात्रातील बेकायदेशीर बांधकाम, अतिक्रमण काढण्याबाबत आज नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन च्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव, प्रांताधिकारी चाळीसगाव, आमदार चाळीसगाव, खासदार जळगाव यांना पत्र दिले.
नदीपात्रात अनेक ठिकाणी पक्के सिमेंट काँक्रिटचे बांधकाम केल्याने मागील वर्षी सुमारे 7 ते 8 वेळा पुराचे पाणी शहराच्या अनेक भागात घुसले होते, या पुरामुळे गुरे-ढोरे वाहून गेली, घरांची पडझड झाली आणि यामुळे आर्थिक झळ नागरिकांना सोसावी लागली होती. नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाणी प्रवाह नागरी वस्ती मध्ये गेल्याने दत्तवाडी, देवी गल्ली, शनी मंदिराजवळ, आंबेडकर चौक, मोची गल्ली, मातंग वाडा, काकडे गल्ली, गुने गल्ली येथे पाणी येऊन गरीब नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले याचे एकमेव कारण म्हणजे नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकाम. येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये या करता नदीपात्रातील बेकायदा बांधकाम नष्ट करावी आणि जनतेची होणारी वित्त व जीवित हानी टाळावी नाहीतर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. खुशाल पाटील, विजय शर्मा यावेळी उपस्थित होते....









Comments