top of page

चावडी महाराष्ट्राची चित्रीकरनाचे जाब खुर्द गावकऱयांनी अनुभवले ऐतिहासिक क्षण

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 15, 2020
  • 2 min read

ree

प्रतिनिधी- राम रेघाटे सर -जिंतुर-चावडी महाराष्ट्राची चित्रीकरणाचे जांब खुर्द गावकर्‍यांनी अनुभवले ऐतिहासिक क्षण

सह्याद्री वाहिनीवरील चावडी महाराष्ट्राची या माहीती व जनसंपर्क संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विशेष गावाची माहीत देणाऱ्या कार्यक्रमाचे जांब खुर्द ता जिंतूर जि परभणी येथे चित्रीकरण करण्यात आले

पाणी फाउंडेशनच्या वाॅटरकपच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ मुक्तीसाठी काम करुन एका दुष्काळी गावाकडून पाणीदार गावाकडे यशस्वीपणे प्रवास केलेल जांब खुर्द हे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात येणार एक छोटसं गाव

आज गावात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील चावडी महाराष्ट्राची या माहीती व जनसंपर्क संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विशेष गावाची माहीत देणाऱ्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले या वेळी चिञीकरणासाठी मुंबई वरुन सह्याद्री वाहिनीची जवळपास 20 जनांची टीम गावात आली होती सकाळपासून रात्री 8 :30 वाजेपर्यंत गावच्या प्राथमिक माहिती पासुन अनेक बाबींवर टीमने चित्रिकरण केले या मध्ये गावात यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन या पैकी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतुन गावाला कशाप्रकारे फायदा झाला तलावातील गाळातुन माळरानावरील शेती कशाप्रकारे सुपीक झाली यावर विशेष चिञीकरण केले या वेळी विविध खेळ गावकऱ्यांच्या कला यावर सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने चिञीकरण झाले यावेळी दिवस भराच्या विविध कार्यक्रमांतुन गावकऱ्यांना खूप आनंद मिळाला या वेळी अनेक जनांच्या मुलाखती देखिल घेण्यात आल्या

याचबरोबर गावाच्या वैभवात मोलाची भर टाकणाऱ्या शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे देखील विशेष चिञीकरण करण्यात आले

कधी नव्हे एव्हढा आनंद गावकऱ्यांना झाला अनेक जनांना आपल गाव आणि आपण टीव्हीवर दीसनार आहोत याच कुतूहल निर्माण झालेल त्यांच्याआनंदी चेहर्‍यावरुन दिसुन आल

या वेळी सह्याद्री वाहिनीच्या टीम सोबत अनुलोमचे जिंतूर तालुका समन्वयक वैभव सोळंके आणि तहसीलचे EGS चे भुजबळ सरांची देखिल विशेष उपस्थिती राहीली

सर्व गावकऱ्यांनी दिवसभरात एखाद्या उत्साहाप्रमाने या ऐतिहासिक क्षणाचा आनंद उपभोगला या विशेष घटनेचा गावकऱ्यांना एव्हढा आनंद झाला की या दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमाचे फोटो सुद्धा काढण्याचे कुणाला सुचले नाही

पुढील आठवडय़ात चावडी महाराष्ट्राची या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमात हे चिञीकरण दाखवण्यात येणार आहे

Comments


bottom of page