top of page

छत्रपती शिवाजी महाराज व भगवान विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त शिवचरित्र व्याख्यान आयोजित

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Feb 29, 2020
  • 2 min read

ree

वार्ताहार-अरुण भालेकर-संभाजीनगर-स्वराजनगर येथे छत्रपति शिवाजी महाराज व भगवान विश्वकर्मा प्रकट दीना निमित्त शिवचरित्र व्याख्यान, निबंध स्पर्धा आयोजित केली होती तशेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वारकरी व विश्वकर्मा वंशीय कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथि प्राचार्य सुनील वाकेकर, स्थानीय नगरसेवक मोहन साळवे, भाजपा शहराध्यक्ष संजय केनेकर, पूर्व मंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे, नगरसेवक कमलाकर जगताप,नगरसेवक रामेश्वर भादवे,विश्वकर्मा वंशीय समाज संघटन प्रदेश सचिव संजय बोराडे,आबासाहेब सिरासाठ, वैभव सालपे आत्माराम वाघ,भागवत पांचाळ गणेश सोनुने संदीपान थोरात, राजेंद्र गाडेकर, विजय बोर्डे,राजू सालपे, बबन पवार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन स्वराजनगर कोचिंग क्लास चे संस्थापक व विश्वकर्मा समाजातील युवा नेतृत्व अरुण भालेकर यांनी केले होते.यात त्यांना त्यांच्या सर्व स्वराजनगर सफ्ताह समिति पवनसुत हनुमान मंदिर व विश्वकर्मा वंशीय समाज सहकाऱ्या नी आयोजनात मदत केली होति.

शिवचरित्र व्याख्यान मध्ये शिवश्री सुनील वाघ यांचे व्याख्यान झाले सर्वाना त्यांनी शिवाजी महाराज यांचे विचार आचारनात आनवेत व महाराजास देवता न बनवित त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकृत करावा.आधुनिकता सर्वात यावी यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

निबंध स्पर्धेत शंभर च्या वर विद्यार्थी विद्यार्थीनी ने भाग घेतला होता.त्यातील तीन निबंध हे रोख रक्कम म्हणून प्रथम ,द्वितीय व तृतीय काढण्यात आले व उत्कृष्ट अकरा म्हणून त्यांना ही सन्मानित केले गेले.व प्रोहत्सान पर सर्वाना वह्या व पेंसिल अशे शालेय साहित्य देण्यात आले.प्रथम क्रमांक

दिपाली मारोती गायकवाड, दिव्तीय अशिष धनवत , तर तृतीय राधा पावरा यांनी पटकावला यांना प्रथम बक्षीस अमित बारेकर 3100 रुपये द्वितीय दत्ताभाऊ राजगुरु 2100 तर तृतीय संजय भालेराव यांच्या तर्फे देण्यात आले.

या कार्यक्रमात परिसरातील वारकरी सम्प्रदाय वाढवन्यात महत्वपूर्ण भूमिका असलेले वारकरी मंडळ संत बहिनाबाई, भगवान बाबा,पवनसुत हनुमान, गणपति मंदिर येथील वारकरी यांचा व प्रभु विश्वकर्मा प्रकट दिन उत्सव समिति भारत नगर,जयभवानी नगर,गोरक्षनाथ नगर,सातारा परिसर या प्रमुख समितीच्या कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिला व जनसमुदाय उपस्थित होता.


या सर्व कार्यक्रमासाठी दुर्गादास वैद्य , मंगेश सपकाळ, दादाराव शिंदे,धनंजय सोळंके,ज्ञानेश्वर रायमल,बालासाहेब रायमल,लक्ष्मण गिरी,माणिक मुळे,भगवान शेळके, अशोक देशमाने, संदीप भालेकर,रामेश्वर थोराईत,रवि चंनेकर, संदीप वैद्य,बालासाहेब घोडेकर,किशोर सोनवणे, दादाराव सोनवणे,जगन वाघुंडे,आदीने सहकार्य केले.

Comments


bottom of page