छत्रपती शाहू महाविद्यालयात हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन
- CT INDIA NEWS
- Sep 1, 2019
- 1 min read

वार्ताहर-मनीष मुथा लासुर-राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त छत्रपती शाहू महाविद्यालय लासुर स्टेशन येथे हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय स्थानिक नियोजन समितीचे अध्यक्ष माननीय श्री नितीन थोरात साहेब , लासुरगाव चे सरपंच व महाविद्यालय कार्यकारिणीचे सदस्य माननीय श्री रणजित बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नाईकवाडे सर कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य मा .श्री सुनील निकम सर, महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा .डॉ कृष्णा परभने सर माध्यमिक क्रीडा विभाग प्रमुख चव्हाण सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते स्पर्धेला महाविद्यालयातील खेळाडूंनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
Comentarios