जुडो आणि कुस्ती मध्ये निवड
- CT INDIA NEWS

- Oct 4, 2019
- 1 min read

वार्ताहार -मनीष मुथा लासुर...दिनांक.... 24 सप्टेंबर 2019.. वार मंगळवार.... धामोरी खुर्द. तालुका गंगापूर येथील साहेबराव पाटील डोणगावकर पब्लिक स्कूल.. या शाळेचा वर्ग सातवी चा विद्यार्थी शैल्या शशिकांत रत्नपारखी हा तालुकास्तरीय जुडो व कुस्ती या क्रीडाप्रकारात सर्वप्रथम आला असून आता त्याची थेट जिल्हास्तरावर निवड झाली आहे.. वाळूज येथे दिनांक 22 व 23 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या या क्रीडा प्रकारात त्याने यश संपादन केलेले आहे.... विशेष म्हणजे हे खेळ खेळत असताना तो कावीळ या आजाराने त्रस्त होता..... तरीही त्याने जिद्द चिकाटी व केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून तो पुर्ण ताकदीनिशी या स्पर्धेत सहभागी झाला व प्रतिस्पर्धी स्पर्धकांना धूळ चारत आजारी असतानाही त्याने यश संपादन केलेला आहे.... या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सचिव..... अड... देवयानी पाटील डोणगावकर( जिल्हा परिषद अध्यक्षा) कृष्णा पाटील डोणगावकर (शिवसेना उपजिल्हाप्रमुख) शाळेच्या वतीने प्रिन्सिपल सौ विजया औताडे मॅडम, शाळेचे समन्वयक श्री रोकडे सर... श्री जाधव सर.... क्रीडाशिक्षक श्री मोकळे सर.. सह सर्व शिक्षक वृंदानी व कर्मचाऱ्यांनी त्याचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे....







Comments