top of page

जातीय सलोखा जपून कोरोनाला हरवला..गावात जातीय तेढ निर्माण होऊ देताकाम नये

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 19, 2020
  • 1 min read

CT INDIA NEWS - प्रतिनिधी मनिष मुथा - लासुर स्टँशन- . आज दिनांक 17- 09- 2020 रोजी 11.00 ते 12.00 वाजेदरम्यान पोलिस ठाणे शिल्लेगाव अंतर्गत लासुर स्टेशन येथे मा. श्री. संदीप गावित साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, गंगापूर यांच्या उपस्थितीत सोसिएल डिस्टनसिंग चे तसेच कोरोना आजाराच्या अनुषंगाने खबरदारी घेऊन जातीय सलोखा बैठक घेण्यात आली. गावात जातीय तेढ निर्माण न होऊ देता सर्व जाती धर्मातील लोकांनी एकोप्याने राहून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवयश्यक उपाययोजना करण्यात याव्या. असे मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीस गावातील सर्व समाजातील नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, गावातील इतर नागरिक असे 20 ते 25 नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. आर. पी.खांडेकर, पोउपनी श्री. दिंडे, कर्मचारी मनोज नवले, अनिल दाभाडे हजर होते.

Comments


bottom of page