top of page

जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेले दोन महिलांना अटक

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jul 3, 2020
  • 1 min read





वार्ताहार -सचिन चौधरी -औरंगाबाद-

2016 मध्ये चालनातून बाद झालेल्या 1000-500 च्या एक कोटी रुपये रकमेच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोन महिला,दोन एजंटसह गुन्हेशाखेच्या पथकाने चार जणांना बेड्या ठोकल्या, ही कारवाई आज सिंधिकॉलोनी भागातील एका हॉटेल मध्ये करण्यात आली.


प्रियंका सुभाष छाजेड वय-30,(रा.कामगार कॉलोनी,चिकलठाणा),नम्रता योगेश उघडे वय-40, (रा.देवानगरी, औरंगाबाद) मुसताक  जमशीद पठाण वय-53,(रा.टाइम्स कॉलोनी, कटकट गेट), हाशिम खान बशीर खान वय-40 (रा.लक्ष्मण चावडी,मोंढारोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.



या प्रकरणी  मिळालेली अधिक माहिती अशी की,सन 2016 मध्ये  भारतीय चालनातून बाद झालेल्या 1000 आणि 500 रुपये किमतीच्या  जुन्या नोटा बदलणारे रॅकेट हे सिंधीकॉलोनी भागातील हॉटेल ग्लोबल-इन येथे येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेचे साह्ययक पोलीस निरीक्षक  मनोज शिंदे यांना मिळाली होती, खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचला व चौघे आरोपी हॉटेल मध्ये गेल्या नंतर पैशांच्या बदलीचा सौदा सुरू असताना पथकाने छापा मारून चौघांना रंगेहात अटक केली.त्यांच्या ताब्यातून जुन्या 1000 च्या किमतीच्या 9610 नोटा ज्याची किंमत 96 लाख 10 हजार व 500 च्या 565 नोटा ज्याची किंमत 2 लाख 82 हजार असे एकूण 98 लाख 92 हजार 500च्या नोटा सह 37  हजाराची मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी कलम 5 व 7 प्रमाणे जवाहरनगर  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीनी या नोटा कोठून आणल्या याचा शोध पोलीस घेत आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद ,उप आयुक्त, मीना मकवणा, साह्ययक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साह्ययक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Comments


bottom of page