जामनेर ,दि . (प्रतिनिधी ) :- कोरोना विषाणू संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरलेल्या जामनेर व पहुर पहूर येथे पाल
- CT India News
- Apr 5, 2021
- 2 min read
जामनेर ,दि . (प्रतिनिधी ) :- प्रतिनिधी- विठ्ठल चव्हाण
कोरोना विषाणू संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरलेल्या जामनेर व पहुर पहूर येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली .याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश सोनवणे यांची ही उपस्थिती होती .
दोन दिवसांपूर्वी अर्जून जाधव य प्राथमिक शिक्षकांचा मृत्यू झाला . आज (ता. ३ ) सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसह महीनाभरात ११ जणांचा कोरानाने बळी घेतला असून बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . प्रशासनाची नजर चुकवून शेतशिवारात लग्न सोहळे धूमधडाक्यात होत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे .ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांमुळे उपलब्ध यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे . त्यात लसीकरणासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध नाही . आज घडीला २१ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत .
या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली .याप्रसंगी त्यांनी सांगितले की , पहूर ग्रामीण रुग्णालयात परमनंट डॉ .नियुक्त करण्याविषयी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहे . कोरोना नियंत्रणासाठी स्वतः नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे . पालकमंत्री या नात्याने पहूर गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले .यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली .जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश सोनवणे , पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ हर्षल चांदा , पोलीस निरीक्षक राहुल खताळ , पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे , वैद्यकिय अधिकारी डॉ जितेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते .
ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही सुविधा मिळत नसल्या बद्दल माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , रवींद्र घोलप यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा केली .या वेळी सरपंचपती शंकर जाधव , उपसरपंच राजू जाधव , शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे , शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे , ग्रामपंचायत सदस्य सोनू बावस्कर , शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे , रविंद्र लाठे , चेतन रोकडे यांच्यासह वैद्यकीय पथक , पोलीस कर्मचारी उपस्थित होते .









Comments