जिल्हा अधिकारी श्री उदय चौधरी यांची मुंबई येथे मंत्रालयात सहसचिव पदी बदली
- CT INDIA NEWS

- Aug 11, 2020
- 1 min read

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुंबईला बदली…
औरंगाबाद, 10 ऑगस्ट(प्रतिनिधी-गणेश चौधरी CT INDIA NEWS ) जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुंबई मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालयात सह सचिवपदी बदलीचे आदेश आज आले आहे. विभागीय आयुक्त यांचा सल्ला घेवून इतर अधिका-यांकडे पदभार देवून नवीन पदभार स्विकारावा असे आदेशात म्हटले आहे. 19 एप्रिल 2018 रोजी औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाची चौधरी यांनी पदभार स्विकारला होता. दोन वर्षाच्या कार्यकाळात कचरा कोंडी, अतिवृष्टी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, समृद्ध महामार्ग भूसंपादन, केंद्र व राज्यातील योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम केले. कोरोनाचे संकट जिल्ह्यातून कमी करण्यासाठी त्यांनी मनपा प्रशासन, पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरु असताना बदलीचे आदेश धडकले. कडक निर्णय घेत कोरोनावर मात देण्यासाठी प्रयत्न केले. कोविड-19 रुग्णांवर उपचार व घाटी, सामान्य रुग्णालय मिनी घाटी, मेल्ट्रान कोविड रुग्णालय बणवण्यासाठी त्यांनी योग्य नियोजन केले. लोकसभा, विधानसभा निवडणुक त्यांच्या कारकिर्दीत शांततेत संपन्न झाले. चौधरी यांनी जेव्हा औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला होता तेव्हा कच-याचा मोठा प्रश्न समोर होता त्यासाठी त्यांनी प्रयत्न करुन कचराकोंडी सोडवली. वयाच्या 25 व्या वर्षात बीटेक पदवी प्राप्त केल्यानंतर IAS झाले. मूळचे जळगाव येथील रहीवाशी आहेत. 2010 बँचचे IAS असलेले उदय चौधरी जूलै 2016 ते एप्रिल 2018 या कालावधीत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला होता. गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, जि.प.वर्धा, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम केले....







Comments