top of page

जिल्हाधिकारी साहेब जर लासुर येथिल वाढत्या कोरोना कडे लक्ष द्या

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 1, 2020
  • 2 min read

ree

जिल्हाधिकारी साहेब लासुर ‌स्टेशन वाढत्या कोरोनोकडे लक्ष द्या साहेब*


* प्रतिनिधी- मनिष मुथा लासुर स्टेशन-


*जिल्हाधिकारी साहेब लासुर ‌स्टेशन वाढत्या कोरोनोकडे लक्ष द्या  साहेब*...


प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱयांची व कर्मचार्याची वाणवा......


गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनची लोकसंख्या जवळपास चाळीस हजाराच्या आसपास असून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जोडलेल्या खेड्या व्यतिरिक्त बोरसर,देवगाव, या आरोग्य केंद्रातील रुग्णही लासुरच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात त्यामुळे ओपीडीला दररोज सातशेच्या पुढे रुग्ण येतात त्यातच महिलांची प्रसूती,गरोदर माता चेकअप,बालकांची तपासणी यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्याअभावी रुगणाच्या नातेवाईकांची व वैद्यकीय अधिकारी यांच्यात वारंवार वादावादी होत असते त्यातच लासुर स्टेशन,दायगाव व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात कोरोनो व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे आरोग्य अधिकारी व कर्मचारी अँटिजेन टेस्टचे कॅम्प दायगाव येथे दोन दिवसांपासून घेत आहे त्यामुळे सर्वच आरोग्य अधिकारी दायगावला गुंतल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारीच उपलब्ध नसतात त्यामुळे लासुर स्टेशन येथे ग्रामीण रुगणालय मंजूर करावे अशी मागणी वारंवार गावकरी व राजकीय पदाधिकारी यांनी सरकार दरबारी केली आहे परंतु घोडे कुठे अडले याची काहीच माहिती सामान्य लोकांना नाहीये त्यामुळे किमान जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांनी लासुर स्टेशन सह परिसरातील गावात वाढत्या कोरोनो रुग्ण संख्येचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय व कर्मचारी यांची संख्या वाढवन्याकडे लक्ष द्यावे अशी आर्त मागणी गावकऱयांकडून होत आहे.

...............................................


प्रतिक्रिया :- श्री.सुनील पाखरे (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती)लासुर स्टेशन येथे ग्रामीण रुगणालय मंजूर व्हावे असे आम्ही वारंवार जिल्हापरिषदकडे लेखी मागणी केली आहे परंतु ना लोकप्रतिनिधी लक्ष देत ना जिल्हापरिषद त्यातच लासुर स्टेशनला कोरोनोच्या रुग्णाणी जवळपास द्विशतक गाठंले आहे त्यामुळे आहे त्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा तसं वाढत असल्याने बाहेरील डोणगाव, खडक नारळा,माळीवाडगाव,गाजगाव येथील आरोग्यसेवक यांना लासुर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावले जाते त्यामुळे त्याठिकानच्या रुग्नाच्या आरोग्याची हेळसांड ऐन कोरोनोच्या वाढत्या प्रदुर्भावात होत असून लवकरात लवकर लासुर स्टेशन येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे अन्यथा लासुर स्टेशन येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात आमरण उपोषण केले जाईल अशी माहितीही पाखरे यांनी दिली आहे.

Comments


bottom of page