जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा उंदिरवाडी येथे भारतीय जवानाच्या हस्ते धोज्यारोहण
- CT INDIA NEWS

- Jan 27, 2020
- 2 min read

वातहिर मनिष मुथा लासुर स्टेशन प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद प्राथमिक डिजीटल शाळा उंदिरवाडी येथे भारतीय सैनीकाच्या हस्ते ध्वजारोहण...
वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक डिजीटल शाळा उंदिरवाडी येथे भारतीय सैन्य दलात सेवेत असलेले
लासुर स्टेशन येथिल श्री राधेकृष्णा पाटील नांगरे Indo-Tibetan Border Police Force पंचकुला (हरियाणा) येथे सेवेत असलेले व Ex Asi CISF लासूर स्टेशन येथील
श्री अंकुश झांबरे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले...या प्रसंगी स्वर्गीय राजाराम बापू साबळे धोंदलगाव(साबळे दवाखाना लासूर स्टेशन) यांच्या स्मृतीपित्यार्थ शाळेतील आदर्श विद्यार्थी पुरस्कार गौरव ताराचंद कदम व आदर्श विद्यार्थीनी पुजा नामदेव त्रिभुवन यास या वीर सैनीकांच्या हस्ते ट्राफी देऊन गौरव करण्यात आले...या प्रसंगी प्रमुख पाहूने विद्यार्थ्यांशी हितगुज करताना विद्यार्थ्यांना एक नवचेतना मिळाली सैनिक नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना एक आवाहन केले की भविष्यात उंदिरवाडी नगरीतील प्रत्येक घराघरातून एक तरी सैनीक सेवेत गेले पाहिजेत व शिक्षकांनी वीर शिपायांची व सैनीकांची यशोगाथा व शौर्य घटना सांगीतल्या पाहीजेत असे मत व्यक्त केले...तसेच श्री झांबरे साहेबांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात व्यायामाला विशेष महत्व दिले पाहीजेत....या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब कदम सह समस्त गावकरी उपस्थीत होते... या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक संजय धनाड यांनी केले व शाळेचे उपक्रमशील शिक्षक अंगद लोणे यांनी आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले तर शिक्षीका पायल बोडखे यांनी आभार व्यक्त केले व शाळेतील समृद्धी लक्ष्मण बडक, हर्षदा बाळू कदम, पूजा नामदेव त्रिभूवन, यश बाळासाहेब कदम, भक्ती अशोक कदम, चैतन्य ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर त्रिभुवन, ऋतुजा बाळू काकडे, तन्वी ताराचंद कदम, सृष्टी नकुल कदम, श्रद्धा अरुण कदम, कल्याणी अरुण कदम, कार्तिकी अण्णासाहेब कदम, कार्तिक बजरंग बडक, अनुष्का नारायण गडकर, नंदनी नारायण गडकर , प्रतिक्षा अण्णासाहेब गराडे , या विद्यार्थ्यांचे इंग्रजी व ,हिंदी व मराठीतुन भाषणे व गीत गायण घेण्यात आले .
२६ जानेवारी या दिवशी भारतरत्न, घटनाकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले जगातील सर्वात मोठे व उत्कृष्ट संविधान अंमलात आले, या देशात असलेली राजेशाही, हुकूमशाही संपली समतेची व धर्मनिरपेक्ष असलेली लोकशाही अर्थात प्रजेचे राज्य आले,खरा खुरा संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक देश झाला..हे केवळ महामानव, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे! जय भीम,जय हिंद 🇮🇳







Comments