जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपूर येथे गटशिक्षणाधिकारी श्रीमती चव्हाण यांच्या हस्ते संपन्न
- CT INDIA NEWS

- Jul 28, 2019
- 1 min read

औरंगाबाद:- (वार्ताहर) दिनांक 27 2019 रोजी गटशिक्षणाधिकारी मॅडम यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपुर च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व ट्रॅक सूट वाटप कार्यक्रम गावाच्या सरपंच बबन दादा वडेकर गावाचे उपसरपंच अनिल भाऊ हिरडे, केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमान पुपले साहेब,शालेय व्य. समिती अध्यक्ष श्रीमान शहाजी भेसर,गावाचे ग्रामसेवक श्रीमान नाईक साहेब, व्यवस्थापन समितीच्या सदस्य श्रीमती फुपाटे तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या साक्षीने संपन्न झाला विद्यार्थ्यांना या वर्षी शालेय गणवेश बदलल्यामुळे उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये ओसंडून वाहत होता ट्रॅक सूट सुद्धा या वर्षी बदल करण्यात आल्याने विद्यार्थी उत्साही होते श्रीमती मॅडम यांनी इंग्रजी शाळेतून 28 विद्यार्थी प्रवेशित झाल्याने कौतुक केले व शाळेची गुणवत्ता वाढीसाठी शुभेच्छा दिल्या शाळेची शैक्षणिक व भौतिक वातावरण बघून मॅडमनी समाधान व्यक्त केले.







Comments