जिल्हा परिषद सदस्य व शालेय शिक्षण सदस्य सौ पुष्पाताई काळे यांच्या प्रयत्नांना यश
- CT INDIA NEWS

- Sep 21, 2019
- 1 min read

सोयगाव-वार्ताहर-संदीप इंगळे सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ना सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात 54 नवीन शिक्षक नियुक्त सोयगाव तालुक्याची दूर दृष्टीच्या विचार डोळ्या समोर ठेवून गेल्या अडीच वर्षांपासून मा.सौ. पुष्पाताई प्रकाश काळे जिल्हा परिषद सदस्य यांनी सोयगाव तालुकाची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता तालुक्यात सर्वात कमी शिक्षक होते कमी शिक्षक असल्यामुळे यांच्या परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यांच्यावर मोठ्या प्रमाणात होत होता काही ठिकाणी तर अशी परिस्थिती झाली होती विद्यार्थी होते परंतु शिक्षक नव्हते या सर्व गोष्टी मा पुष्पाताई काळे यांनी लक्षात घेऊन जिल्हा परिषद मध्ये पाठपुरवठा चालू ठेवला होता सोयगाव तालुक्याची स्थिती CO मॅडम पवणीत कोर मॅडम यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या त्यांनी या मागण्या मान्य करून शिक्षण अधिकारी श्री सुरेश जैस्वाल साहेब यांनी नवीन शिक्षक 32व समायोजन शिक्षक 22 व एक लिपिक उपलब्ध करून दिले या मुळे आता सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती आता मोठया प्रमाणात सुधारण्यास मदत होईल व शिक्षणा साठी बाहेर जाणारे विध्यार्थी याच्या वर मोठ्या प्रमाणात आला बसेल यात आता शंका नाही असे जिल्हा परिषद व शालेय शिक्षण सदस्य पुष्पाताई काळे यांनी सांगितले.







Comments