top of page

जबरे हनुमान ने मिळवला “स्वाभिमान दहीहंडी” फोडण्याचा मान

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 26, 2019
  • 2 min read

ree

आकाश हिवराळे:- यंदा दिमाखदार सोहळ्यात कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी महोत्सवात उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी उपस्तीती दर्शवून गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, शहराध्यक्ष विशाल दाभाडे यांनी उपस्तित मान्यवरांचे स्वागत केले. स्वाभिमान दहीहंडी महोत्सव गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत असून यंदाही १४ व्या वर्षी हा महोत्सव दिमाखदार झाल्याचा विश्वास अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दहीहंडी महोत्सवादारम्यान महिलांसाठी विशेष आसनव्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. तसेच प्रथोमोपंचारासाठी विशेष आरोग्य पथकाचे नियोजनही करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने सिडको कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान दहीहंडी मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आणि पर्यावरणाचा समतोल राखत यावर्षी दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील सर्वप्रथम मानाची दहीहंडी गोविंदा पथकाच्या सहभागाने सलामी देऊन फोडण्यात आली. दुपारी दोन वाजता या महोत्सवाला प्रारंभ होऊन गोविंदा पथकांनी या दहीहंडीला सर्वप्रथम हजेरी लावली. सूर वाद्याच्या तालावर गोविंदा पथकाचे लक्षवेधी एकावर एक थर, पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे दीपावणारे क्षण आणि उंचावर असलेल्या स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या दहीहंडीला सुमारे ३० गोविंदा पथकांनी सलामी दिली. यातील प्रत्येक पथकांने सहा ते सात थर रचत उपस्थितांचे लक्ष वेधले होते. गोविंदा रे गोविंदा गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसली. या महोत्सवात स्थानिक कलावंतांनी आपली हजेरी लावली. यंदा गोविंदा पथकाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्रिरत्न गोविंदा पथक, रोहिदासपुरा गोविंदा पथक, जय राणा पथक, जय भद्रा पथक, उत्तरमुखी हनुमान गोपाल पथक, याुवा गोविंदा पथक, जागृत हुनमान गोविंदा पथक, सिद्धीविनायक गोविंदापथक, मोरया गोविदा पथक, देवा श्री गणेशा मित्रमंडळ, विर संभाजी गोविंदासह अनेक पथकांनी सहभाग घेतला होता. प्रथम पथकाला ५१ हजार, द्वितीय पथकाला ३१ हजार तर तिृतिय पथकाला २१ हजार रुपये बक्षीस देण्यात आले.स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड, धनंजय अतकरे, विशाल दाभाडे, फेरोज पटेल, कुणाल मराठे, प्रदीप राठोड, मनीष जठार, प्रशांत वावरे, राहुल कोरवार, सोनू कदम, अनिकेत सूर्यवंशी, नितेश टेकाळे, अनिरुद्ध सूर्यवंशी, गिरीश बांगर, निलेश सदावर्ते, गीताराम कांबळे, अमर ठाकूर, रउफ पठाण, विकास चव्हाण, जीवन रोदळ, सिराज कुरेशी, अनिकेत थारयानी, भावेश रंगवाणी, अमर घुले, सदानंद कांबळे उपस्थित होते. महिलांसाठी विशेष आसनव्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. प्रथोमोपंचारासाठी विशेष आरोग्य पथकाचे नियोजन करण्यात आले. दहीहंडीचे सूत्रसंचालन लोकेश कुमावत यांनी केले.

Comments


bottom of page