top of page

टी-पॉईंट ते जाधववाडी याठिकाणी ट्राफिक पोलीस आहेत की नाही नागरिकांना पडलाय प्रश्न

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Nov 30, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहर:-सागर खंडागळे जाधववाडी टी पॉईंट असे ओळखले जाणारे सिग्नल म्हणजेच जळगाव हायवे वरती होणाऱ्या पोलिसांच्या गैरसुविधा वेळोवेळी येथील सिग्नल वर पोलिस कर्मचारी नसतात पण नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून पोलिस कर्मचाऱ्यांना कोणाच्याही जीवाशी घेणं देणं राहिलेलं नाही. तेथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आज भरपूर त्रास होत असून सुद्धा ते कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांना सांगू शकत नाही त्याच करण म्हणजे त्या ठिकाणी पोलीस कर्मचारीच नसतात तेथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण होत असून सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी त्या सिग्नल ची रूपरेखा पाहून नागरिकांना पूर्णपणे मदतीचा हात द्या अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. आटो रिक्षावाले त्या ठिकाणी नको ती दादागिरी करून सिट भरण्यासाठी त्या जाधववाडी टी पॉईंट वर हाणामारी होत असून त्या हणामारिला आळा घालावा त्याची दादागिरी पूर्णपणे बंद झाली पाहिजे असे काही आटो रिक्षा वाल्याना पोलीस निरीक्षक साहेबानी धडा शिकवला पाहिजे ही घटना वारंवार होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांना सिटी न्यूज इंडिया रिपोर्टर कडे मांडली. 1)क्लासेस मधल्या विद्यार्थाना होणार त्रास 2)येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून नागरिकांना जावे लागते 3)दारुड्या लोकांच्या भीतीने रस्त्यावरून पळत पळत जाणे एखादी वेगाने जाणाऱ्या गाडीची भीती की एखादी गाडी उडवून जाते की काय तरी पोलिस निरीक्षक साहेबांना विनंती आहे की या अडचणी पासून नागरिकांच्या मनातील भीती पूर्णपणे निघून गेली पाहिजे त्याचं कारण म्हणजे पोलिस कर्मचारी त्या ठिकाणी नसणे

Comments


bottom of page