टोम्पे महाविद्यालयाच्या रासेयो तर्फे वृक्षरोपण, संवर्धन आणि जनजागृती अभियानास सुरवात
- CT India News
- Jul 13, 2021
- 1 min read
प्रतिनिधी- विकी पानकर -चाळीसगाव
टोम्पे महाविद्यालयाच्या रासेयो तर्फे वृक्षरोपण, संवर्धन आणि जनजागृती अभियानास सुरवात
स्थानिक गो. सी टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकांतर्गत वृक्षरोपण, संवर्धन आणि जनजागृती अभियानास आज महाविद्यालय परिसरात प्रातिनिधिक स्वरूपाचे वृक्षांची लागवड महाविद्यालय परिसर आणि रिद्धपुर येथे करून सुरवात करण्यात आली. याप्रसंगी पिंपळ, कडुनिंब, वड, चिंच, कवठ, बेल, आंबा, आवळा, उंबर, गोंदण, अशोक, शिरीष, कदमब, बकुळ, सालई, डिकामाली, शिवण, जारूळ, जांभूळ, बेहडा, हिरडा आणि सप्तपर्णी अशा ऑक्सिजन उत्सर्जित करणाऱ्या विविध वृक्षांची लागवड येत्या एक महिण्यात करण्यात येणार असून त्यामध्ये महाविद्यालयात एकूण २०० स्वयंसेवकांचे युनिट असून प्रत्येक स्वयंसेवकास आपल्या गावातील परिसरात अथवा शेतात आणि महाविद्यायालयीन प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी प्रत्येकी एक असे जवळपास ३०० वृक्ष लागवड महाविद्यालय परिसर आणि विदयार्थ्यांच्या गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजना द्वारे लावण्याचा मानस संस्थेचे सचिव श्री. भास्करदादा टोम्पे यांच्या मार्गदर्शनात तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांच्या नेतृत्वात आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी आणि प्रा.डॉ निधी दीक्षित यांच्या प्रत्यक्ष संकल्पनाने राबविण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवडीची गरज विशद करत या उपक्रमामध्ये प्रत्येक विदयार्थाने, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याने उस्पृतपणे सहभागी होवून वसुंधरेला वाचविण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी केलेत. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशःवीतेकरिता रोसेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर वारंगे, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. शरद नानोटे आणि श्री. हर्षल ओकटे, गोलनदास गुळसुंदरे, संतोष ठाकरे,शुभम गुळसुंदरे,वैभव काळे, राम खापरे, शिवानी तेलखडे, वैष्णवी खोम्बाडे, आदिती भाकरे आदी स्वयंसेवक आणि विदयार्थी परिश्रम घेतलेत.









Comments