top of page

ठाकरे सरकार कडून लॉकडाऊन 31 ऑगस्ट पर्येंत वाढवण्याचा निर्णय

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 4, 2020
  • 1 min read

प्रति

ree

निधी-सचिन चौधरी -महा ब्युरो चिफ(मुंबई)


ठाकरे सरकारकडून लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय


केंद्र सरकारकडून कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम असणार आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आदेशात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यासोबत 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत निर्बंध शिथील करण्यासंबंधीही सूचना करण्यात आल्या आहेत. नियमांचं कठोरपणे पालन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे.


नव्या आदेशात जुन्या गाइडलाइन्समध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. पण महत्त्वाचं म्हणजे - मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सना ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास परवानगी नाही. पण होम डिलिव्हरी करण्यासाटी फूड कोर्ट आणि रेस्तराँ आपलं किचन सुरु ठेऊ शकतात.

सोबतच आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज, व्यायामशाळा, टेनिस, बॅडमिंटन आणि मल्लखंब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास मात्र परवानगी नाही.

दरम्यान दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक ३ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे.

दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधीही परवानगी होती ते सुरु राहतील तसंच अनावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधी सुरु ठेवण्याची परवानगी आहे ते सुरु राहतील.. अत्यावश्यक तसंच अनावश्यक मार्केट, मार्केट परिसर आणि दुकानांना सकाळी ९ चे संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. मद्य दुकानांना परवानगी असेल तर सुरु ठेऊ शकतात. अत्यावश्यक तसंच अनावश्यक गोष्टींसाठी ई-कॉमर्सला परवानगी असून सध्या सुरु असलेल्या सर्व इंडस्ट्रियल युनिट्सना काम सुरु ठेवण्याची परवानगी आहे.

Comments


bottom of page