top of page

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला.

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 24, 2019
  • 2 min read

ree

औरंगाबाद :- प्रतिनिधी अमरदिप हिवराळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा वर्धापनदिन शुक्रवारी (दि.२३) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रख्यात इतिहास संशोधक डॉ.रा.श्री.मोरवंचीकर यांना ‘जीवन साधना पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. वर्धापनदिनास इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली येथील सचिव मा.डॉ.सच्चिदानंद जोशी, माजी कुलगुरु, डॉ.कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता विद्यापीठ, (रायपूर) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे सल्लागार मा.डॉ.दिलीप मालखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थान भुषविले होते. विद्यापीठाच्या नाटयगृहात शुक्रवारी (दि.२३) हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मा.प्रकुलगुरु डॉ.प्रविण वक्ते कुलसचिव डॉ.साधना पांडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ.फुलचंद सलामपुरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. याच कार्यक्रमात चार जिल्हयातील प्रत्येकी एका महाविद्यालयास आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कार देण्यात आला. यामध्ये देवगिरी महाविद्यालय (औरंगाबाद), बद्रीनारायण महाविद्यालय (जालना), सुंदरराव सोळुंके महाविद्यालय (माजलगांव), तसेच रामकृष्ण परमहंस महाविद्यालय (उस्मानाबाद) या महाविद्यालयांच्यावतीने प्राचार्य डॉ.शिवाजी थोरे, प्राचार्य कविता प्राशर, डॉ.व्ही.पी.पवार व प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याचवेळी परीक्षा विभागाची विविध पारितोषिकेही प्रदान करण्यात आली. तत्पुर्वी मा.कुलगुरु यांच्या हस्ते मुख्य ईमारतीसमोरील हिरवळीवर सकाळी ९:५० वाजता ध्वजारोहण करण्यात आला. तरुणाईन इच्छाशक्तीवर विद्यापीठाचा पुढे न्यावे मा.डॉ.सच्चिदानंद जोशी यांचे प्रतिपादन भारताचा समृध्द सांस्कृतिक वारसा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ समर्थपणे चालवित आहे. प्रबळ ईच्छाशक्ती असलेल्या तरुणांच्या बळावर या विद्यापीठाला पुढे न्यावे, असे प्रतिपादन मा.डॉ.सच्चिदानंद जोशी यांनी केले. सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध मुद्दे सविस्तरपणे मांडले. ते म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाले असून भौतिक सुखाच्या आपण मागे लागलो आहोत. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे निसर्ग प्रत्येकाची गरज पूर्ण करतो ‘हाव‘ पूर्ण करु शकत नाही, असेही ते म्हणाले. आपल्या विद्यापीठात प्राचीन ग्रंथाच्या दुर्मिळ ऐवज आहे, ऐतिहासिक वस्त हा ठेवा समृध्द व जतन करुन ठेवण्यासाठी प्रकल्प मंजूर करु, असेही ते म्हणाले. अत्यंत सामर्थशक्ती असलेल्या आपल्या विद्यापीठाला डॉ.प्रमोद येवले यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भरभरारी व प्रगतीचे दिवस येतील, असा विश्वासही डॉ.जोशी यांनी व्यक्त केला. या वेळी परीक्षा मंडळाच्या विविध पुरस्कारांची यादी परीक्षा मंडळाचे संचालक डॉ.गणेश मंझा यांनी घोषित केली. सामाजिक संवेदनाचं विद्यापीठ : मा.कुलगुरु देशातील अन्य विद्यापीठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या एक मुलभूत फरक आहे, तो म्हणजे सामाजिक संवेदना व जाणिव या आपल्या विद्यापीठाशी थेटपणे जोडलेला आहेत. अशा या विद्यापीठाला प्रगतीच्या नव्या टप्प्यावर घेऊन जाऊ, असा विश्वासही मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. एक जवाहरीच ख-या सोन्याची पारख करु शकतो, ही डॉ.मोरवंचीकर यांनी दिलेली प्रतिक्रिया आशिवार्द आहे, असही मा.कुलगरु म्हणाले. ‘शिक्षक, अधिकारी विद्यापीठस‘ एका घोषणा यावेळी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी या तीनही वर्गात प्रत्येकी एकाला पुरस्कारांना गौरविण्यात येईल, अशी घोषणाही मा.कुलगुरु यांनी केली. डॉ.मोरवंचीकरांचे भावस्पर्शी भाषण जीवनसाधना पुरस्कारने गौरविण्यात आल्यानंतर प्रख्यात इतिहास संशोधक डॉ.रा.श्री.मोरवंचीकर यांनी अत्यंत मार्मिक शब्दात भावस्पर्शी भाषण करुन उपस्थितांची मने जिंकली. इतिहास संशोधनासाठी आयुष्य समर्पित केल्यानंतर होत असलेल्या हा गौरव ऊर्जा देणारा आनंद द्विगुणीत करणारी आहे. माणसाने कितीही मोठं झाले तरी स्वत:मध्ये डोकावून पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘पैठणी‘वर लिहिलेल्या ग्रंथाची आठवन मांडत असताना डॉ.मारेवंचीकर भावविवश झाले. उपस्थितांनी टाळयांच्या गजरात इतिहासातील ‘भिष्माथामाला‘दाद दिली. शिक्षण व्यवस्थेत देशाचे भवितव्य : डॉ.मालखेडे कोणत्याही देशाचे भवितव्य अंधकारमय करायचे असेल, नष्ट करायचे असेल तर केवळ क्षेपणास्त्रांची आवश्यकता नसते. केवळ त्या देशातील शिक्षण व्यवस्था मांडली की देश नष्ट होत असे प्रतिपादन डॉ.दिलीप मालखेडे यांनी केले. मराठवाडयाच्या विकास प्रक्रियेत विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. जबरदस्त ईच्छाशक्ती व आशावारी असलेल्या कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ निश्चितच भरभराटीला येईल, असा विश्वासही डॉ.मालखेडे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक प्रकुलगुरु डॉ.प्रविण वक्ते यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेताला.

Comments


bottom of page